भीम टायगर सेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:47 PM2018-08-30T22:47:37+5:302018-08-30T22:47:49+5:30
नवी दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुरूवारी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला महात्मा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवी दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुरूवारी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला महात्मा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भीम टायगर सेनेच्यावतीने २२ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीकरिता साखळी उपोषण सुरु केले आहे. या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मुंबई येथील नालासोपारा परिसरात सनातन संस्थेच्या व्यक्तीकडे १६ जिवंत बॉम्ब तर २० बॉम्बचे साहित्य आढळून आले. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. झोपडपट्टी वासियांना कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थ्यांना लाभ द्यावा. स्वच्छता अभियान अंतर्गत शौचालय योजना अर्धवट राबविण्यात आली. त्याची पूर्तता करण्यात यावी. रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांना कागदपत्रांच्या जाचक अति रद्द कराव्या. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल दिवे, शहर अध्यक्ष विशाल रामटेके यांच्या नेतृत्वात नगरसेवक परवेज खान, धम्म शेलकर, प्रदीप कांबळे, पंकज लभाने, आशिष जांभुळकर, विनय खैरकार, आशिष दिघाडे , नितीन कुंभारे, सुरज बडगे, पंकज मुन, मंगेश मेश्राम, अनशु तेलंग, दीपक नेहरकर, बाबा जाकीर, अहमद पठाण, विकास झंझाळ, सोनू सहारे, प्रकाश कोरडे, राहुल पिंपळकर, अनिकेत गजभिये, स्वप्नील गोटे, अमित गजभिये, प्रतीक ठोबरे, पलेश कुलकर्णी, प्रशांत रामटेके, प्रणय कांबळे, विशाल पाटील, नरेश सावरकर, अमित गजभिये, राजू शेकोकार, अंकुश गजभिये, जगदीश जवादे, स्वप्नील रंगारी, बादल शेळके, प्रज्वल डंभारे, प्रदीप मेंढे यांच्या सह भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.