वेगळ्या विदर्भाकरिता रास्ता रोको
By admin | Published: January 12, 2017 12:27 AM2017-01-12T00:27:54+5:302017-01-12T00:27:54+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, वाघाडी फाउंडेशन, विदर्भ राज्य आघाडी
भिडीतही आंदोलन : विविध संघटनांचा सहभाग
समुद्रपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, वाघाडी फाउंडेशन, विदर्भ राज्य आघाडी व तालुक्यातील विविध विदर्भवादी संघटनांनी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्त्वात बुधवारी जाम चौरस्ता येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करून सोडून दिले.
विदर्भात शेतीशी निगडीत असलेला शेतकरी व शेतमजूर वर्ग आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. राज्यात सत्ता कुठल्याही सरकारची असो, शेती निगडित प्रश्नांवरील धोरणे नेहमी उदासीनच राहिली आहेत. विदर्भात बेरोजगारी, बालमृत्यू, शेतकरी आत्महत्या, नक्षलवाद या सारख्या असंख्य समस्या आहेत. सध्या विदर्भाची परिस्थ्तिी दिवसेंदिवस दयनीय व चिंताजनक होत आहे. येथील सिंचनाचे प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकले नसल्याने सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमानात आहे. तो भरून काढायला जवळजवळ २०९९ उगविण्याची शक्यता आहे. गत दहा वर्षात ४० हजार शेतकरी आत्महत्या एकट्या विदर्भात झाल्याची नोंद आहे. कुपोषणाने दोन लाख बालके गत १५ वर्षात मृत्यूमुखी पडली. उद्योगांची इथे मारामार असल्याने रोजगाराची समस्या आहे.