विद्यार्थ्यांसह गावकºयांचा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:56 AM2017-11-10T00:56:36+5:302017-11-10T00:57:43+5:30
तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी एकत्र येवून रस्तारोको केला.
यावेळी राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. एक बस आल्यावर काही विद्यार्थी बसवून घेतले तर उर्वरित विद्यार्थी दुसºया बसच्या प्रतीक्षेत होते. या प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन पाठविण्यात आले. शिरकुटणी, ममदापूर, सुजातपूर या तीन गावातील शंभरावर विद्यार्थी आष्टीला शिक्षणासाठी जातात. विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू आहे. त्यामुळे वेळेवर परिक्षासाठी जावे लागते. शाळेत गेल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना धारेवर धरतात अशा वेळी विद्यार्थ्यांना दोन्हीकडून मनस्ताप सहन करावा लागतो. गत महिन्याभरापासून सकाळी आर्वी-मोर्शी व आर्वी-वरुड या दोन्ही बस ११.३० ते १२ वाजता येतात तर काही बस आल्यावर थांबा न देता सरळ निघून जातात. त्यामुळे खासगी वाहनांचा आधार घेवून आष्टीला यावे लागते. आर्वी येथील आगार व्यवस्थापक आणि तळेगाव येथील आगार व्यवस्थापक बस येतात एवढे सांगून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज सकाळी ९.३० वाजता ३० ते ४० विद्यार्थी शिरकुटणी काल्याजवळ थांबले. ११.२५ झाले तरी बस आली नाही. मोर्शी आगाराची एनएच ४० ए ८८७५ ही बस आल्यावर थांबली नाही. त्यामुळे वातावरण आणखिच तापले. याचा निषेध करीत लागलीच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून संताप व्यक्त केला. रस्तारोको होताच गावातील नागरिकही आले. दरम्यान आर्वी आगाराची ०८५२ ही बस आली. बसला विद्यार्थी व गावकºयांनी घेराव घातला. चालकाने अर्धे विद्यार्थी बसून नेले. उर्वरित विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत थांबले. रस्तारोको वेळी गावकरी जयराम कोहरे, ईश्वर वाघाडे, कपील श्रीराम, पंकज इरपाचे, दिनेश कुमरे, अंकुश सहारे, शक्ती कोहरे, दिपक निकाळजे, श्याम धोटे, शेषराव गवळीकर, प्रकाश धोटे, विद्यार्थीमध्ये गौरी उईके, हरिष पुसाम, दामिनी खानपासोडे, प्रासिक डोंगरे, चेतन दुधकवरे, सारंग नेहारे, सचिन उकार, गायत्री इरपाची, रणजीत आत्राम, हितेश धुर्वे यांच्यासह गावकºयांनी ठिय्या मांडला होता.