विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:33 PM2017-08-21T23:33:15+5:302017-08-21T23:33:45+5:30

पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, शासन व पाणी प्रदूषण मंडळाने आदेश दिले आहेत.

Stop the water pollution of the immersion | विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा

विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा

Next
ठळक मुद्देमहाराष्टÑ अंनिसचे जिल्हाधिकाºयांना निवेदन : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, शासन व पाणी प्रदूषण मंडळाने आदेश दिले आहेत. याचा आधार घेत नदी, नाले, विहिरींतील विसर्जन रोखून जलस्त्रोत नष्ट होण्यापासून थांबवावे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, महाराष्ट्र अंनिसच्या याचिकेवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, महाराष्ट्र शासनाने काढलेले आदेश, केंद्रीय व राज्य पाणी प्रदूषण मंडळ यांनी मूर्ती व निर्माल्यामुळे पिण्याचे व वापरात येणारे पाणी प्रदूषित होणार नाही, यासाठी काढलेल्या सर्व आदेशांच्या सत्यप्रती जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या. जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेने कृत्रिम हौद उपलब्ध करून देण्याचे आदेश आहे; पण जिल्ह्यातील कोणत्याही नदी, नाला, ओढ्यावर वा इतर पर्यायी हौद निर्माण केले नाहीत. यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवमानना होत आहे. ती होऊ नये म्हणून लोकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा. हिंदु जनजागृतीसारख्या संघटना नदीतच मूर्तीचे विसर्जन करा, असे सांगतात. त्यांना समज देत प्रसंगी गुन्हे दाखल करावे, भाविकांचे प्रबोधन करावे, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, सुधीर पांगुळ, अतुल शर्मा, ढाले, उटाणे आदी उपस्थित होते.
लहान मूर्ती स्थापनेचा संकल्प
नाचणगाव : दरवर्षी गणेशोत्सवात मोठ-मोठ्या आकर्षक अशा गणेशमूर्ती दिसतात व त्यांची स्थापना विविध मंडळांद्वारे करण्यात येते; पण यंदा पावसाने दडी मारल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी, नदी, नाल्यांना पाणी कमी आहे. यामुळे मिरा कॉलनी येथील गणेशोत्सव मंडळाने लहान मूर्ती स्थापन करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
दरवर्षी शहर व परिसरातील गणेशमूर्तीचे विसर्जन वर्धा नदी पात्रात केले जाते. लहान-मोठे सर्वच मंडळ या पात्रात मूर्ती विसर्जित करतात. नदीचे पात्रही तुडुंब भरलेले असते; पण यंदा अत्यल्प पावसामुळे नदी पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे विसर्जनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरा कॉलनी येथील नागरिक दरवर्षी गणेशोतसव साजरा करतात. यात यंदा लहान मूर्ती बसविण्याचा संकल्प केला आहे. यामुळे कमी पाण्यात मूर्तीचे सहज विसर्जन होईल. मूर्ती मातीची असल्याने पाण्यात लवकर विसर्जित होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचा मानस कॉलनीतील नागरिकांनी व्यक्त केला आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिंवस कमी होत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात पेयजल संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी पाण्यात मोठ्या मूर्तीचे विसर्जन करणे शक्य नाही. शिवाय प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे नैसर्गिक जलस्त्रोत बुजतात. हा प्रकार टाळण्यासाठी केवळ मातीच्याच मूर्ती स्थापन करणे गरजेचे झाले आहे. मिरा कॉलनीमध्ये लहान मूर्तीचा संकल्प केला असून नागरिकांनीही या उपक्रमाचे अनुकरण करणे पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचे झाले आहे.
उत्सव काळात पर्यावरणपूरक वस्तू वापरा
वर्धा शहरात धार्मिक मंडळांतर्फे मोठ्या प्रमाणात लंगरचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यात प्लास्टिक प्लेटस् व वाट्यांचा उपयोग केला जातो. यामुळे शहरात प्रदूषण होत असून प्लास्टिक मातीत नष्ट होत नाही. यामुळे लंगरमध्ये प्लास्टिक प्लेटा व वाट्यांचा उपयोग न करता पळसाच्या पानाच्या पत्रावळी, द्रोणचा वापर करून शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 

Web Title: Stop the water pollution of the immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.