संस्कार अॅग्रोत कामगारांचे काम बंद
By admin | Published: May 8, 2016 02:39 AM2016-05-08T02:39:44+5:302016-05-08T02:39:44+5:30
येथील संस्कार अॅग्रो कंपनीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी शनिवारी कामबंद आंदोलन पुकारले.
विविध मागण्यांचा समावेश : पर्याय न निघाल्यास आंदोलन तीव्र
वायगाव (नि.) : येथील संस्कार अॅग्रो कंपनीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी शनिवारी कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनानंतर कामगार व कंपनी व्यवस्थापनात चर्चा झाली; मात्र यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा कामगारांच्या संघटनेने दिला आहे.
या कंपनीत कामगार कामावर गेले असता हेतुपरस्पर मशीनची गती वाढवून कामगारांच्या जीवाशी खळ करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. येथे काम करणाऱ्या कामगारांशी कोणताही लेखी करार झाला नाही. करारासंबंधातील सर्वच नियम धाब्यावर बसवून गरजेच्या तुलनेत कमी कामगार घेत त्यांच्याकडून काम करून घेण्यात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या बाबत कंपनी प्रशासनाला विचारणा केली कामगारांना उद्धट वागणूक मिळते. तसेच वायगाव (नि.) ते भानखेडा बस सेवा सुरू करण्यात यावी यासह इतरही काही मागण्या कामगारांकडून करण्यात आल्या आहेत. पण त्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आल्याने शनिवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. अद्याप कुठलाही तोदगआ निघालेला नाही. यावर १४ मे रोजी बैठक घेण्यात येणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष आशिष घोडखांदे, उपाध्यक्ष उमेश ठाकरे, सचिव प्रफुल सुरकार, सहसचिव प्रविण लोखंडे, कोषाध्यक्ष विनोद राऊत, प्रशांत भगत, अविनाश शेंडे, राहुल उरकुडे, चंद्रकांत गोल्हर, बनोटे यांनी दिला आहे.(वार्ताहर)