‘धाम’ची साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:04+5:30

१९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला.

The storage capacity of 'Dham' decreased by 5.5 baht | ‘धाम’ची साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने घटली

‘धाम’ची साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने घटली

googlenewsNext
ठळक मुद्देगाळाचा फटका : तीनपैकी एकाच ठिकाणाहून काढला गाळ

महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्प पूर्ण झाल्यापासून या जलाशयातून गाळ काढण्यात आला नाही. परिणामी या जलाशयाची पाणी साठवण क्षमता तब्बल ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचे २०१४-१५ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पुढे आले. ‘गाळमुक्त धाम करेल पाणी समस्येवर मात’ या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच झोपेचे सोंग घेणारा पाटबंधारे विभाग सर्वेक्षणानंतर चार वर्षांनी खडबडून जागा झाला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गाळ काढण्याच्या कामाला लागला. परंतु, या विभागाने धामचे बुडीत क्षेत्र असलेल्या तीन पैकी केवळ एकाच ठिकाणावरून नाममात्र गाळ काढण्यात आल्याचे वास्तव असून धाम प्रकल्प अद्यापही पुर्णपणे गाळमुक्त झालेला नाही.
प्राप्त माहितीनुसार, १९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.०२५ दलघमीने कमी झाल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता पुनर्जीवित करण्यासाठी २०१५ किंवा २०१६ मध्ये विशेष काम होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. वर्धा शहर व शहराशेजारील सुमारे १५ गावांतील नागरिकांना धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. परंतु, गाळयुक्त असलेल्या धाम प्रकल्प व धाम प्रकल्पात असलेल्या कमी जलसाठ्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात वर्धा शहरासह शहराशेजारील सुमारे १४ गावांना जलसंकटाला सामोरे जावे लागले. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम पूर्णपणे गाळमुक्त होणे गरजेचे असल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावर धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या खैरवाडा, मासोद व ब्राह्मणवाडा येथून गाळ काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून निश्चित करण्यात आले. त्या अनुषंगाने वर्धा पाटबंधारे विभागाने सुरूवातीला खैरवाडा (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये), मासोद (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये) व ब्राह्मणवाडा (२४ लाख ५५ हजार ६०० रुपये) निधीचे प्राकलन तयार केले. परंतु, हा विषय अधिक खर्ची ठरू पाहत असल्याने व त्यासाठी निधी वेळीच उपलब्ध होणे थोडे अवघड असल्याचे लक्षात येताच धाम गाळमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. त्याला एका कंत्राटदाराने प्रतिसाद देत जेसीबी व ट्रॅक्टर नि:शुल्क उपलब्ध करून दिले. तेव्हा मासोद परिसरातून नाममात्र गाळ काढला; पण उर्वरित दोन ठिकाणाहून गाळ काढला नाही. गाळमुक्त धाम हा विषय सध्यातरी अर्धवटच आहे.
धाम १०० टक्के भरला
महाकाळी येथील धाम प्रकल्प उन्हाळ्याच्या अखेरीस मृत जलसाठ्यावर आला होता. त्यानंतर पावसाने आपला जोर कायम न ठेवल्याने यंदा हा जलाशय पूर्ण भरणार नाही, असा अंदाज वर्तविल्या जात होता. परंतु, बाप्पाच्या आगमनापूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान धाम प्रकल्प १०० टक्के भरला असून सध्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.
मासोद परिसरातून काढला ४४,२६४ घ.मी. गाळ
यंदाच्या उन्हाळ्यात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेनंतर वर्धा पाटबंधारे विभागाने पुढाकार घेत धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र असलेल्या मासोद परिसरातून गाळ काढला. दमदार पावसाला सुरूवात होण्यापूर्वीपर्यंत या परिसरातून केवळ ४४ हजार २६४ घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. या प्रकल्पात असलेल्या गाळाच्या तूलनेत काढण्यात आलेला गाळ नाममात्र असून थोड्या प्रमाणातच या प्रकल्पाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: The storage capacity of 'Dham' decreased by 5.5 baht

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण