जीवनावश्यक साहित्याची केली घरांमध्ये साठवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:02+5:30
संचार बंदीच्या काळात भाजीपाला व दुध विक्रीचे केंद्र सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत तर किराणा व धान्याची दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत आणि औषधीची दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. तर पेट्रोलपंप सकाळी ७ ते दुपारी ५ याच वेळेत सुरू राहणार आहेत. लॉक डाऊनच्या काळात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होईल, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना (कोविड-१९) ची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे. या लॉक डाऊनला कुणी घाबरू नये. शिवाय या दिवसांमध्ये जीवनावश्यक साहित्यांचे दुकाने आणि औषधीची दुकाने दिलेल्या वेळेत नियमित सुरू राहतील असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धान्य, तेल, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्याची खरेदीकरण्यासाठी सदर साहित्याच्या दुकानांकडे नागरिकांनी एकच धाव घेतल्याचे बुधवारी दिसून आले.
संचार बंदीच्या काळात भाजीपाला व दुध विक्रीचे केंद्र सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत तर किराणा व धान्याची दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत आणि औषधीची दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. तर पेट्रोलपंप सकाळी ७ ते दुपारी ५ याच वेळेत सुरू राहणार आहेत. लॉक डाऊनच्या काळात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होईल, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. परंतु, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. असे असले तरी बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली. शिवाय अनेक नागरिकांनी किमान महिन्याभराचे राशन घरी नेले. कुणी सायकलवर तर कुणी दुचाकी गाडीने हे जीवनावश्यक साहित्य घरी नेताना दिसले.
कमविला जातोय जादा मुनाफा
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील किराणा व्यावसायिकांची दुकाने ठरवून दिलेल्या कालावधीत खुली ठेवण्याची मुबा देण्यात आली आहे. परंतु, याच संधीचे सोने काही किराणा व्यावसायिक करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून किमान १०० रुपयांची वस्तू तब्बल १५० रुपयांपर्यंत विक्री करून जादा मुनाफाच सध्या कमविल्या जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार नागरिकांची आर्थिक लुट करणारा ठरत असल्याने निगरानी पथकांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई - एसडीएम
जीवनावश्यक वस्तूंची कुणी साठेबाजी करीत असेल तर त्याची तक्रार थेट जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांसह मला थेट द्यावी. जीवनावश्यक वस्तंूची साठेबाजी करणाऱ्यांवर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जादा मुनाफा कमवू पाहणाºया व्यापाºयांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल. इतकेच नव्हे तर अशा मुनाफाखोरांच्या दुकानाला सील ठोकून दुकानातील धान्य शासन दरबारी जमा करण्यात येईल, असे उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार
जिल्हाधिकारी : नागरिकांनी घाबरून जाऊ नये
वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉक डाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण आहे. जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाºया वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी २१ दिवसांच्या लॉक डाऊनला घाबरून जाण्याची गरज नाही. या काळात नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवणावश्यक वस्तूंची दुकाने नेहमी प्रमाणे रोज मर्यादित कालावधीसाठी उघडी राहणार आहेत. भाजी आणि दूध सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत आणि अन्नधान्य व किराणा दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील १४४ कलम आहे ती तशीच लागू राहील, असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे.