महामंडळाच्या तीन बसचा विचित्र अपघात; चालकासह १७ प्रवासी जखमी

By अभिनय खोपडे | Published: May 10, 2023 02:58 PM2023-05-10T14:58:24+5:302023-05-10T14:59:04+5:30

जंगलापूर फाट्याजवळील घटना

Strange accident involving three ST Corporation buses; 17 passengers including the driver were injured in wardha | महामंडळाच्या तीन बसचा विचित्र अपघात; चालकासह १७ प्रवासी जखमी

महामंडळाच्या तीन बसचा विचित्र अपघात; चालकासह १७ प्रवासी जखमी

googlenewsNext

सेलू (वर्धा) :  एसटी महामंडळाच्या तीन बसेस एकामागून एक धडकल्याने झालेल्या विचीत्र अपघातात चालकासह १७ प्रवासी जखमी झालेत. यातील अनेकांना डोक्याला, हाताला व चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाची इजा झाली. ही घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर महामार्गावर महाबळा नजिकच्या जंगलापूर फाट्याजवळ घडली.       

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळा शिवारातील जंगलापूर फाट्याजवळ एसटी महामंडळाची एम एच ४० वाय ५५८५ क्रमांकाची बस पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी सदर बसमधील प्रवाशांना घेण्यासाठी तीच्या पाठीमागे एम एच ०६ एस ८०९० क्रमांकाची नागपूर ते दिग्रस ही बस थांबून होती. दरम्यान नागपूर येथून वर्ध्याकडे जाणारी देगलूर ते नांदेड ही एम एच २० बीएल ४१०४ क्रमांकाची बस ही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उभ्या असलेल्या दोन्ही बसवर जोरात आदळली. ही घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास जंगलापूर फाट्याजवळ घडली. या विचीत्र अपघातात एका बस चालकासह १७ प्रवासी जखमी झाले. यात बालाजी नरसिंग कावळे(वय४४) रा. उदगीर, अंकुश बिसेन माकडे(वय३८) रा. नागपूर, पुजा राजू तिजारे(वय१६), कुंदा राजू तिजारे(वय४२), पियुष राजू तिजारे(वय२०) तिघेही रा. वर्धा, लक्ष्मी महादेव मुटकुरे(वय७०) रा. नागपूर, गणेश गोविंद नागोसे(वय४०), दुर्गा गणेश नागोसे(वय३६) दोन्ही रा. पारडी, नागपूर, अनिकेत नरेश चांदोरे(वय२२) रा. आमगांव ता. सेलू, देवल केशव वालके(वय२९) रा. नागपूर, श्रुतिका रमेश दांडेकर(वय१४), रत्नमाला रमेश दांडेकर(वय३९), नैतिक रमेश दांडेकर(वय९) तिन्ही रा. माना, पुणे, शिबा मोहम्मद हेतेश्याम(वय२८), मोहम्मद हेतेश्याम मोहम्मद शाबीर(वय४०), मोहम्मद सैफ मोहम्मद हेतेश्याम(वय५), मोहम्मद फैयाज मोहम्मद हेतेश्याम(वय६) चौघेही रा. विनोबा भावे नगर, नागपूर अशी सदर अपघातातील जखमींची नाव आहेत. यातील कोणाला गंभीर तर कोणाला किरकोळ स्वरूपाची इजा झाली असून जखमींवर सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.      

सदर अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. यावेळी आमदार डॉ पंकज भोयर हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. यासोबतच स्वतः रुग्णालयात जावून त्यांनी जखमींची आस्थेने विचारपूस देखील केली. सदर अपघातानंतर येथील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. पोलीस हवालदार मडावी व विक्रम काळमेघ यांनी अपघातग्रस्त बसेसना रस्त्याच्या कडेला करीत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Strange accident involving three ST Corporation buses; 17 passengers including the driver were injured in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.