आहार, विहार, विचारांचे संतुलन हेच स्ट्रेस मॅनेजमेंट सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:48 PM2018-08-28T23:48:41+5:302018-08-28T23:49:51+5:30

एखाद्या प्रसंगी, घटनेत अथवा परिस्थितीत आपल्याजवळ संसाधन कमी असतात आणि पे्रशर जास्त येतात. त्यामुळे मानसिक ताण येतो, ताण येणं हे वाइृ नसतं, तो एक प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझामचे काम करतो. स्ट्रेसमुळे आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो.

Stress management formula is the balance of diet, recreation and thinking | आहार, विहार, विचारांचे संतुलन हेच स्ट्रेस मॅनेजमेंट सूत्र

आहार, विहार, विचारांचे संतुलन हेच स्ट्रेस मॅनेजमेंट सूत्र

Next
ठळक मुद्देडॉ. सुरेखा ठक्कर : मानसिक ताणतणावावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एखाद्या प्रसंगी, घटनेत अथवा परिस्थितीत आपल्याजवळ संसाधन कमी असतात आणि पे्रशर जास्त येतात. त्यामुळे मानसिक ताण येतो, ताण येणं हे वाइृ नसतं, तो एक प्रोटेक्टीव्ह मेकॅनिझामचे काम करतो. स्ट्रेसमुळे आपण उत्कृष्ट कार्य करू शकतो. ज्याप्रमाणे पतंगीला तिचा दोरा आणि वारा पंच उडण्यास मदत करते तसेच स्ट्रेस देखील आपल्याला मदत करीत असतो. फक्त त्याचे योग्य ते व्यवस्थापन करता यायला हवे. त्याकरिता स्ट्रेस हा नकारात्मक न घेता सकारात्मक दृष्टीकोन, पिरॅडिक रिलॅक्ससेशन आवश्यक असून तणावा विषयीची जागरूकता गरजेची आहे असे प्रतिपादन एडमास विद्यापीठ कोलकत्ता आणि सी.व्ही. रमण विद्यापीठ रायपूरच्या माजी कुलगुरू तथा जनमाध्यम विशेषज्ञ डॉ. सुरेखा ठक्कर यांनी केले.
इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (ईप्टा) आणि यशवंत दाते स्मृती संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच स्थानिक यशवंत दाते स्मृती संस्थेच्या सभागृहात डॉ. सुरेखा ठक्कर यांचे ‘स्टे्स मॅनेजमेंट’ ताण तणाव व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यान पार पडले. यावेळी हिंदी विश्वविद्यालयाच्या परफार्मींग आर्ट विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सतीश पावडे , यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. ठक्कर म्हणाल्या की, स्ट्रेस एज लाईक अ फायर असला तरी आगपेटीच्या काडी सारखे जळून न जाता आत्मपे्ररणा प्रकाशित करायची. ज्या प्रमाणे निखाऱ्यावर राख धरते पण आत आग धगधगत असते. त्याप्रमाणे ताणाने आत्मप्रेरणा, स्वऊर्जा प्रज्वलीत करायची असते आणि त्यासाठीच आहार, विहार आणि विचारांचे उत्तम संतुलन साधून तणावाचे व्यवस्थान करावे लागते. किंबहुना आहार, विहार आणि विचारांचे सुयासेग्य संतुलन हेच स्ट्रेस मॅनेजमेंटचे मुलभूत सुत्र आहे आणि याकरिता शारीरिक कसरत मेडीटेशन महत्वाचे ठरते. तेव्हा दिवसातून किमान दहा मिनीट तरी प्रत्येकाने हे केल्यास आपण योग्यरित्या ताणतणावाचे व्यवस्थापन करू शकतो असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सतीश पावडे यांनी जागतिकीकरणाच्या या जीवघेण्यास स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती हा ताणतणावाच्या जाळ्यात अडकून पडला आहे. त्याचा परिणाम त्या कार्यशक्तीवर ही झाला आहे. त्यामुळे उत्तम निरोगी सकारात्मक समाज निर्मिती करीता तसेच सकारात्मक त्या व्यक्तीमत्वाच्या निर्मितीसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटची गरज असून सर्वानीच ताणतणावाचे उत्तम व्यवस्थापन साधण्याची कला आत्मसात केली पाहिजे. त्याकरिता वेळोवेळी अशी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आयोजित केले जावे, असेही त्यांनी प्रामुख्याने मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनीही या विषयाची महती विशद केली. प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र मुंडे यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू बावणे यांनी केले. याप्रसंगी गुणवंत डकरे, डॉ. सिद्धार्थ बुटले आदी उपस्थित होते.

Web Title: Stress management formula is the balance of diet, recreation and thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.