२९ लाखांच्या चोरी प्रकरणात दोन्ही आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा

By admin | Published: May 6, 2017 12:36 AM2017-05-06T00:36:43+5:302017-05-06T00:36:43+5:30

शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या २९ लाख ९० हजार रूपयांच्या मुद्देमाल चोरी प्रकरणातील दोन्ही

Strict labor punishment for both the accused in the theft of 29 lakh rupees | २९ लाखांच्या चोरी प्रकरणात दोन्ही आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा

२९ लाखांच्या चोरी प्रकरणात दोन्ही आरोपींना सक्त मजुरीची शिक्षा

Next

वर्धा : शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या २९ लाख ९० हजार रूपयांच्या मुद्देमाल चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपींना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस.जी. अग्रवाल यांनी सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. शैलेंद्र उर्फ सिलिंडर महेंद्र तिरपुडे (२६) रा. सेवाग्राम, संघपाल दशरथ वैद्य (२८)रा. स्टेशनफैल या दोघांचा समावेश आहे.
या घटनेतील फिर्यादी हे सहकुटुंब जळगाव येथे गेले असता त्यांच्या घराचे मुख्य दार तोडून चोरी केली. त्यांच्या घरातील २९ लाख ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय मगर, पोलीस कर्मचारी महादेव सानप, इम्रान खिलची, गोपाल बावणकर यांनी शैलेंद्र तिरपुडे आणि संघपाल वैद्य यांना अटक करीत तपास करून प्रकरण न्यायालयात निवाड्याकरिता सादर केले.
या खटल्याची सुनावणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस.जी. अग्रवाल यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अग्रवाल यांनी महेंद्र तिरपुडे याला तीन वर्षाच्या सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली तसेच दुसरा आरोपी संघपाल वैद्य याला एक वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.
शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांनी खटल्याच्या सुनावणी दरम्यान साक्ष पुराव्याबाबत साक्षीदारांना मार्गदर्शन केले. शासनाच्या वतीने अ‍ॅड. समीर दुंगे यांनी युक्तीवाद केला. जमादार विजय हातेकर यांनी त्यांना सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Strict labor punishment for both the accused in the theft of 29 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.