जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:33 PM2019-02-03T23:33:32+5:302019-02-03T23:33:51+5:30

देशातील सर्वोच्च सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिल्याने, अनेक विषय मार्गी लावता आले. जात, पात, धर्म, पंथ व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व सामान्यांचे कार्य करत राहणे व जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे हेच ध्येय आहे,.....

Strive to get justice for the people | जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नरत

जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नरत

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : प्रांतिक तैलीक समाजाच्या संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील सर्वोच्च सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिल्याने, अनेक विषय मार्गी लावता आले. जात, पात, धर्म, पंथ व कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व सामान्यांचे कार्य करत राहणे व जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणे हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
वर्धा जिल्हा प्रांतिक तैलीक समाजाच्या संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर यांच्यावतीने संताजी सभागृहात विदर्भस्तरीय उपवर-वधू व पालक परिचय मेळावा खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रविण हिवरे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, नयना झाडे, माजी सभापती मिलींद भेंडे, चंद्रकांत महाकाळकर, संताजी सेवा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बुरले उपस्थित होते. पुढे बोलताना खा. तडस म्हणाले की, संत जगनाडे महाराजांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी करण्यास शासनाची मान्यता, राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा प्राप्त करुन देणे, तैलीक समाजाकरिता मुंबई येथे स्वतंत्र सभागृह बांधकामाकरिता भुखंड उपलब्ध करून देणे, क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना मदत करणे इत्यादी विषय मार्गी लावण्याकरिता प्रयत्न कायमच असतील. तसेच संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ व वर्धा जिल्हा प्रांतिक समाजाने नेहमीच आपल्या सामाजिक जाणिवेतून दरवर्षी उपवर मुलामुलींचा व पालकांचा परिचय मेळावा व माहीती पुस्तिका विमोचन सोहळा आयोजित करतात, या उपक्रमांत उपस्थित राहता आल्याचा आनंद होत आहे, असेही खा. तडस म्हणाले.
यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, तैलीक महासभेचे जिल्हा अध्यक्ष अतुल वांदीले, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रविण हिवरे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बुरले यांनी आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच आतापर्यंतच्या उपक्रमांची माहिती दिली. उपस्थितांचे आभार सचिव सुनिल शिंदे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र झाडे, उपाध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष सचिन सुरकार, कोषाध्यक्ष सुधिर चाफले, सहसचिव जगन्नाथ लाकडे, सहसचिव नितीन साठोणे, संघटक विनायक तेलरांधे, संचालक पुष्पा डायगव्हाणे, संचालक सुरेंद्र खोंड, हरीष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, नामदेव गुजरकर, नरेंद्र भुरे, दिलीप चरडे, विनोद इटनकर यांच्यासह सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहाकार्य केले. या मेळाव्याला विदर्भातील प्रांतिक तैलीक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Web Title: Strive to get justice for the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.