अपंग हेमंतची जगण्यासाठी धडपड

By admin | Published: May 5, 2017 01:55 AM2017-05-05T01:55:25+5:302017-05-05T01:55:25+5:30

वृद्ध आई, आजारी पत्नी आणि दोन चिमुकली मुलं. यात अंगी आलेले अपंगत्त्व. पण जगण्याचा बाणा कायम.

The struggle for survival of the disabled | अपंग हेमंतची जगण्यासाठी धडपड

अपंग हेमंतची जगण्यासाठी धडपड

Next

तीन चाकीवर थाटले दुकान : पोटाची खळगी भरण्यासाठी शिवतो चपला जोडे
सचिन देवतळे   विरूळ (आकाजी)
वृद्ध आई, आजारी पत्नी आणि दोन चिमुकली मुलं. यात अंगी आलेले अपंगत्त्व. पण जगण्याचा बाणा कायम. कुणासमोर हात पसरवायचे नाही, भिक मागायची नाही, असे म्हणत रसुलाबाद येथील हेमंत शेगोकार याने थेट तीन चाकीवर जोडे चप्पल शिवण्याचा व्यवसाय थाटून कोणत्याही परिस्थितीत स्वाभीमानाने जगणे शक्य असल्याचे सर्वांना दाखिवले आहे.
आर्थिक परिस्थितीने व्यक्ती गरीब किंवा श्रीमंत ठरतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील व्यक्तीला आले तर त्याच्यावर उपचार करणेही कठीण जाते. तुमची परिस्थिती हलाखीची असली आणि त्यातही शरीर अधू असले तर जगताना कोणी आधार देईलच असे नाही. यात अनेक अडचणींवर मात करीत जीवन जागावे लागते. अशीच काहीशी स्थितीत नजीकच्या रसुलाबाद येथील हेमंत शेगोकार या युवकाची झाली. मात्र त्याने हिम्मत न सोडता अपंगत्वाचे ओझे घेवून स्वाभीमानाने आपला संसार थाटला. संसाराचा गाडा हाकण्याकरिता त्याने तीन चाकी सायकलवरुन लोकांची फाटकी पादत्राने शिवून आपल्या व पत्नी दोन लहान मुले व वृद्ध आईचा उदरनिर्वाह करीत आहे
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या हेमंतची कहानी तशी विदारकच. जन्मापासुन दोन्ही पायांनी अपंग असलेल्या हेमंतला चालताच येत नाही. इतरांच्या मदतीने दिवसभराच्या क्रिया पार पाडाव्या लागतात. कोणाची मदत भेटली तर ठीक नाही तर त्याच जागेवर पडुन राहावे लागते. पत्नीच्या मजुरीवर संसार चालायचा. अशातच पत्नी आजारी पडल्याने दोन लहान मुले आणि आईच्या भरणपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. यात कुणाची मदत घ्याची नाही, असे म्हणत त्याने तीनचाकी सायकलीचा आधार घेत त्या सायकलवर चपला जोडे शिवण्याचे दुकान थाटले. एखाद्या परक्या व्यक्तीला तो सायकलवर बसुन मागतो व गावोगावी फीरुन चपला जोडे शिवून परत घरी येतो. यातुन आपल्या संसाराचा गाडा चालवितो. त्याला राहायला पडके घर आहे, तेही जीर्ण झाले आहे. घराकरिता शासन दरबारी अनेक चकरा मारल्या; परंतु अद्यापही घरकुलचा लाभ भेटला नाही. साधे राशन कार्डही त्याच्या नावाने बणले नाही.
हा व्यवसाय करतांना त्याला कमालीच्या वेदना सहन कराव्या लागतात; परंतु ईलाज नाही, एक दिवस जर काम बंद असले तर ऊपवास पडतो. ऐखादे कर्ज काढून घरबसल्या दुकान टाकावे अशी त्याची ईच्छा आहे; परंतु त्याला साधे कर्जही भेटले नाही. असा एकच हेमंत नसून अनेक आहेत. त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाकडून काही ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

गाडीवर बसताना लागतो कुणाचातरी आधार
हेमंतला त्याच्या तीनचाकीवर बसण्याकरिता कुणाचातरी आधार घ्यावा लागतो. कुठे अडचण आल्यास कुणालातरी शोधावे लागते. अपंगांकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांच्या योजना आखण्यात येतात. त्यातील एखाद्या योजनेचा लाभ हेमंतला देत त्याला सोईचे होईल, असे एखादे दुकान देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The struggle for survival of the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.