उष्णतामानात केळी पीक जगविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:14 PM2018-05-06T22:14:40+5:302018-05-06T22:14:40+5:30

जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे.

 Struggling to save banana crop in summer | उष्णतामानात केळी पीक जगविण्यासाठी धडपड

उष्णतामानात केळी पीक जगविण्यासाठी धडपड

Next
ठळक मुद्देपारा ४४ अंशांवर : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. मात्र, सध्या वर्धा जिल्ह्याचा पारा ४४ अंशाच्यावर पोहोचल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली असून केळी पीक जगविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.
पवनार येथील प्रगतशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी यावर्षी २० फेब्रुवारीला केळी पिकाची पाच एकरामध्ये लागवड केली. ७ हजार ५०० रोप त्यांनी लावली आहेत. सध्या वाढत्या उष्णतामानात केळी पीक जगविण्याचे मोठे आव्हान केळी उत्पादक शेतकºयांसमोर आहे. वाघमारे यांच्या शिवाय पवनार, सुरगाव या भागातही अनेक शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. सेलू तालुक्यात अनेक गावात केळीचे उत्पादन घेतले जाते. उकाड्यापासून केळीचा बचाव करण्यासाठी बोरूची लागवड केळीच्यामध्ये किंवा बाजूला केली जाते. अनेक शेतकरी केळी पिकाच्या रोपाजवळ पाणी व ओल टिकून राहावे म्हणून ठिबंक सिंचन यंत्रणेचा अवलंब करतात. तर काही शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी केळीच्या बगीचाचे वातावरण टिकून राहावे म्हणून प्रिक्लंरचाही वापर सुरु केला आहे, अशी माहिती कुंदन वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना दिली. वाढत्या उन्हामुळे केळी उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज
खानदेशात मोठ्या प्रमाणावर तपत्या उन्हामुळे केळी पीक करपले असताना वर्धा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी केलेल्या नियोजनामुळे उन्हाळ्यातही केळी पीक काही प्रमाणात बऱ्यापैकी स्थितीत आहे. परंतु, सध्या पारा झपाट्याने वर चढत असल्याने शेतकºयांच्या अडचीत भर पडली आहे. त्यामुळे त्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

ग्रामीण भागात शेतीच्या फिडरवर आठ तासाचे भारनियमन दिले जात आहे. त्यामुळे केळी पिकाच्या ओलीतासाठी उर्वरित विद्युत असलेल्या काळातच पाण्याचे नियोजन करावे लागते. त्यामुळे मोठी कसरत होत आहे. अशा परिस्थितीत केळी पीक जगविणे उत्पादकांना उष्णतामानात कठीण जात आहे.
- कुंदन वाघमारे, केळी उत्पादक शेतकरी, पवनार.

Web Title:  Struggling to save banana crop in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.