एसटीची दुचाकीला धडक; दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:20 PM2019-05-17T22:20:17+5:302019-05-17T22:20:36+5:30
तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सोनेगावजवळ नागपूरवरून अहेरीकडे जात असलेल्या एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झालेत. शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सोनेगावजवळ नागपूरवरून अहेरीकडे जात असलेल्या एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघे गंभीर जखमी झालेत. शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.जनार्दन अंबाडरे (६२) व अमोल नगराळे (३०) दोघेही रा. जोगिनगुंफा अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
जोगिनगुंफा येथील जनार्दन अंबाडरे व अमोल नगराळे हे दोघेही दुचाकीने जनार्दन अंबाडरे यांच्या पुतण्याच्या विवाह समारंभाकरिता केळझर येथे जात असताना नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सोनेगावजवळ नागपूरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या अहेरी सावनेर बस क्रमांक एम. एच. ४० वाय. ५००६ ने दुचाकी क्रमांक एम. एच. ३२ ए.एफ. ३७१३ ला जबर धडक दिली. यात दुचाकीचालक अमोल नगराळे व मागे बसून असलेले जनार्दन अंबाडरे हे दोद्येही गंभीर जखमी झाले.
अपघाताविषयी जाम महामार्ग पोलिस चौकीला माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे, कांचन नवाते, गजानन राऊत, विनोद थाटे, दीपक जाधव, सुनील भगत, प्रवीण चव्हाण यांनी घटनास्थळ गाठत जखमींना उपचाराकरिता नागपूर येथे रुग्णालयात पाठविले.
या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धावा घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली.