छात्र सेनेकडून सीमेवरील २५०० सैनिकांना पाठविल्या राख्या
By admin | Published: August 15, 2016 12:51 AM2016-08-15T00:51:13+5:302016-08-15T00:51:13+5:30
स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सिमेवरील सैनिकांना दरवर्षी राख्या पाठविण्यात येतात.
उपक्रम : छात्र सैनिकांनी तयार केल्या राख्या
वर्धा : स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सिमेवरील सैनिकांना दरवर्षी राख्या पाठविण्यात येतात. याच उपक्रमाची परंपरा कायम ठेवत एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना पथकातर्फे २५०० राख्या तयार करुन भारत-पाक सिमेवरील आर्मी बटालियनला पाठविण्यात आल्या.
महाविद्यालयात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात छात्र सैनिकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय उपस्थित होते.
राष्ट्रीय छात्र सेना पथकाच्या वतीने सैनिकांच्या प्रती आदर, प्रेम व राष्ट्रीय भावना निर्माण करण्याचा संस्कार आज काळाची गरज आहे. सिमेवरील सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम प्रशंसनिय आहे, असे मत खासदार तडस यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर सैनिक वैद्यकीय युनिटचे कमाडंट हरजिंदर सिंग, एन.सी.सी. युनिटचे सुभेदार संतोष सिंग, एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. गणेश मालधुरे, प्रा. संतोष मोहदुरे, प्रा. गोपाल हेलोंडे, पालक प्रतिनिधी सोहन गोमासे, प्रा. यावले, प्रहार संस्था सचिव संतोष तुरक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सार्जंट कोमल गोमासे यांनी तर आभार कार्पोरल अमृता जाधव हिने मानले. यशस्वीतेकरिता रेजंर लिडर अश्विनी घोडखांदे, रवी बकाले, अंडर आॅफिसर वैभव भोयर, आशिष परचाके, पुजा गिरडकर, अपुर्वा कठाणे, दिक्षा खैरकार, राजकुमार भोवते, करिश्मा वाघमारे, दिक्षा खैरकार, अक्षय गावंडे व एन.सी.सी. छात्रसैनिकांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)