विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग ज्ञानार्जनासाठी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 10:24 PM2018-02-08T22:24:11+5:302018-02-08T22:24:22+5:30

सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेकी वापर वाढत आहे. मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम घडून येत आहेत.

Students are advised to use mobile for knowledge | विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग ज्ञानार्जनासाठी करावा

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग ज्ञानार्जनासाठी करावा

Next
ठळक मुद्देस्पर्धेतील सूर : यशवंत महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेकी वापर वाढत आहे. मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम घडून येत आहेत. मोबाईल ही वस्तू ज्ञान देणारी उत्तम वस्तू असली तरी त्याचा वापर विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविण्यासाठीच करावा असा सूर वादविवाद स्पर्धेतून व्यक्त झाला.
यशवंत महाविद्यालयात मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी फायदेशीर आहे? या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. उत्तम पारेकर तर प्रा. प्रमोद नारायणे, डॉ. रवींद्र बेले, प्रा. उमाकांत डुकरे, विद्यापीठ प्रतिनिधी अक्षय नवघरे मंचावर उपस्थित होते.
या स्पर्धेत अक्षरा ठाकरे, अपेक्षा माथनकर, अंकित गिरी, भूषण साळवे, शितल कुडमथे, आचल मेघरे, कांचन बैनलवार या विद्यार्थ्यांनी विषयाच्या विरोधी बाजूने बोलताना मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी करूच नये अशी भूमिका घेतली. त्यांनी दाखला देताना अनेक थोरपुरुषांचे उदाहरण दिले. त्याकाळात मोबाईल नसतानाही ते ज्ञानी झाले, मग आज ज्ञानार्जनासाठी मोबाईलची गरज काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
विषयाच्या बाजूने बोलताना निलोफर खान, शुभम घारपुरे, भोजराज आंबटकर, गौरव तामगाडगे, प्रकाश हुलके, वंदन बोरकर यांनी मोबाईल वापराचे समर्थन केले. तंत्रज्ञान युगात मोबाईलशिवाय राहणे शक्य नसून ते मोठे ज्ञानभांडार असल्याचे सांगितले. आपण आपल्या हातात ज्ञान घेऊन वावरत असतो. जगातले संपूर्ण ज्ञान केव्हाही कुठेही मिळवू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले. वरिष्ठ विभागातून प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे भुषण साळवे, अपेक्षा माथनकर यांना मिळविले. तृतीय क्रमांक आचल मेघरे व संघपाल मून यांना विभागून दिला. कनिष्ठ विभागातून प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे अल्फिया शेख, अश्विनी कबाडे तर तृतीय क्रमांक खुशाल राठोड व संकेत भुजाडे यांनी मिळविला. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. रूपसिंग चव्हाण, डॉ. संजय धोटे, प्रा. संदीप चव्हाण यांनी केले. संचालन निवेदिता फुसाटे यांनी केले तर आभार गौरव तामगाडगे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. रविशंकर मोर, डॉ. विद्या शहाणे, प्रा. प्रणाली हिवरकर, रियाज शेख, भगवान गुजरकर इत्यादींनी सहकार्य केले.
दृष्टिकोन महत्त्वाचा
कोणत्याही गोष्टीकडे आपण कशाप्रकारे पाहतो यावर त्याचा सदुपयोग व दुरुपयोग अवलंबून असतो. प्रत्येक बाबीला दोन बाजू असतात. त्याचा योग्य वापर झाल्यास ती लाभदायक ठरते. मात्र अतिरेकी वापर हा त्रासदायक ठरतो. विद्यार्थ्यांनी मोबाईलकडे ज्ञानाचे एक साधन म्हणून पाहावे असा सल्ला डॉ. उत्तम पारेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Web Title: Students are advised to use mobile for knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.