शिष्यवृती प्रस्तावातून भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना वगळले; पालकांमध्ये रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 02:54 PM2022-10-29T14:54:07+5:302022-10-29T14:55:17+5:30

..तर विद्यार्थी शिक्षणापासून राहणार वंचित

Students belonging to nomadic tribes were excluded from the scholarship offer | शिष्यवृती प्रस्तावातून भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना वगळले; पालकांमध्ये रोष

शिष्यवृती प्रस्तावातून भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना वगळले; पालकांमध्ये रोष

Next

पोहणा (वर्धा) : २०२२-२३ या शैक्षणिक सत्राचे विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती प्रस्ताव पंचायत स्तरावर स्वीकारणे सुरू आहे परंतु नव्याने प्राप्त झालेल्या यादीतून भटक्या जमातीला वगळल्याने इयत्ता १ ते १० वी पर्यंतच्या भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारु नये असे पत्र जिल्हा समाजकल्याण विभागाकडून मुख्याध्यापकांना प्राप्त झाल्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.

२५जून २००८ रोजी शासनाने विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीयांची यादी अद्ययावत केली. त्यानुसार भटक्या जमातीत मोडणाऱ्या भोई जातीसह तत्सम जात असलेल्या भनारा,भनारी,भनारे या जातीतील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असे; परंतु २०१९-२०या सत्रापासून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी बालकृष्ण रेणके आयोगाने सादर केलेली यादी शासनाने मान्य केल्याने सदर यादीत व्हीजेएनटी प्रवर्गातील एकूण ५३ जाती आहेत मात्र रेणके आयोगाच्या मंजूर यादीत अधिसूचित जमातीच्या १५ आणि भटक्या जमातीच्या २६ अशा एकूण ४१ जातींचाच उल्लेख करण्यात आला आहे.

या यादीतून भटक्या जमाती (ब) ला वगळण्यात आल्याने पालकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. ३० ऑक्टोबर रोजी कारंजा(लाड) येथे होणाऱ्या विदर्भ भटक्या जमातीच्या अधिवेशनात यासंबंधी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती भनारी समाजाचे नेते गजानन उमाटे यांनी दिली.

Web Title: Students belonging to nomadic tribes were excluded from the scholarship offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.