विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलीस कार्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:05 AM2018-01-08T00:05:11+5:302018-01-08T00:05:23+5:30
स्थानिक पोलीस ठाण्यात पोलीस रेझींग दिवसाचे औचित्य साधुन शालेय विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस अधिकाºयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : स्थानिक पोलीस ठाण्यात पोलीस रेझींग दिवसाचे औचित्य साधुन शालेय विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस अधिकाºयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुुरुवात पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांनी पोलीस रेझींग डे विषयी माहिती देऊन केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कापसे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती दिली. ज्यामध्ये स्टेशन डायरी, बिनतारी माहिती आदान-प्रदान प्रणाली, गुप्तचर शाखा आदी विभागाची माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या शस्त्राविषयी माहिती दिली. सदर शस्त्र हाताळत असताना विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच आनंद दिसत होता. तळेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मॉडेल हायस्कुल तसेच पी. आर. पाटील पॉलिटेक्नीक कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला योगेश वानखडे, प्रफुल्ल ठाकुर, प्रा. महेंद्रसिंग गुरुनासिंगांनी, प्रा. गिरीष घोरमाडे, प्रा. तेजस्वीनी पाटील, प्रा. अंकीता देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ठाणेदार सुरेश भोयर, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले, राजेंद्र कापसे, महेंद्र शंभरकर, परवेज खान, हकीम शेख, शाम गहाट, सिद्धार्थ टोकसे, पंढरी धुर्वे, वसंता मुंगले, शुभांगी निघोर, वैशाली हादवे आदींनी सहकार्य केले.गिरड पोलीस स्टेशन येथे उपक्रम
गिरड - येथील पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यात विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. याप्रसंगी ठाणेदार महेंद्रसिंह ठाकूर, ज्येष्ठ नागरिक मुरलीधर पर्बत, शांतात कमिटीचे अध्यक्ष रहिम शेख, सरपंच चंदा कांबळे, समाजसेवक अब्दुल कदीर, वसंत पर्बत, पोलीस पाटील इंद्रपाल आटे, प्रेम दीक्षित, विलास नवघरे, मुख्याध्यापिका रेखा डरे, कामना त्रिवेदी, वाणी, मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पोलीस अधिकाºयांनी विद्यार्थ्यांना पोलीस कचेरीत चालणाºया कामाची माहिती दिली. ज्यामध्ये नागरिकांच्या तक्रार कशा घेतल्या जातात, स्टेशन डायरी म्हणजे काय, पोलीस कोठडी, दखल पात्र व अदखल पात्र गुन्हे, शस्त्राची माहिती, हेलमेटचा वापर, सायबर क्राईम म्हणजे काय, वाहतुकीचे विविध नियम आदींचा समावेश होता. सदर माहिती विद्यार्थ्यांना ए. एस. आय. निशाणे, रामदास दराडे, सोनवणे, गजानन राऊत यांनी दिली.
ठाणेदार महेंद्रसिंह ठाकूर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलिसांना नेहमीच नागरिकांचे सहकार्य हवे असते असे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन जमादार विनोद भांडे यांनी केले तर आभार प्रशांत ठोंबरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेंद्र गिरी, अजय वानखेडे, रहीम शेख, सोनवणे, प्राजक्ता नाईक, धम्मश्री सुखदेव, सीमा जांगळेकर, प्रमोद सोनवणे, दीपक जाधव आदींनी केले.