इयत्ता अकरावी, बारावीच्या प्रवेशात विद्यार्थ्यांची लूट
By admin | Published: June 29, 2016 02:14 AM2016-06-29T02:14:03+5:302016-06-29T02:14:03+5:30
शहरात इयत्ता अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रिया व प्रवेश शुल्काबाबत शाळांचा मनमानी कारभार सुरू आहे.
युवा सेनेचा आरोप : गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
हिंगणघाट : शहरात इयत्ता अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रिया व प्रवेश शुल्काबाबत शाळांचा मनमानी कारभार सुरू आहे. यात विद्यार्थ्यांची लूट होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
शहरातील कनिष्ठ महाविद्यालय, विना अनुदानित वर्गांच्या नावावर विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेत आहे. नियमानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच विना अनुदानित तत्वावरील प्रवेश दिले जातात; पण असे न करता नियम बाजूला ठेवून पैसे लाटण्याचा प्रकार सुरू आहे. यातील आयटी आणि सीएस या विषयाच्या प्रवेशासाठीही विद्यार्थ्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत चौकशी करावी. विद्यार्थ्यांना वेळेत न्याय मिळवून द्यावा, अन्यथा युवा सेनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देताना अभिनंदन मुनोत, प्रकाश घोडे, अभिषेक चव्हाण, मनोज निखाडे, प्रतिक भोंग, अंकीत त्रिवेदी, सारंग कोयाडवार, हर्षल बालपांडे, शुभम भांडे, अक्षय बेलेकर, उमेश तुमडाम, सागर अतकरे, अनुप घुबडे, अखिलेश गौतम, ऋतिक भांडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)