विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:02 AM2017-12-22T01:02:46+5:302017-12-22T01:02:57+5:30
विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री केल्यास जीवन जगण्याचा आनंद मिळतो. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री केल्यास जीवन जगण्याचा आनंद मिळतो. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले.
येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्रेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरस्वती वंदना व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
शाळेचा शिक्षकच उद्घाटक म्हणून उपस्थित असणे ही गौरवाची बाब आहे, असा उल्लेख मडावी यांनी यावेळी केला. स्रेहसंमेलन ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असून अंगीभूत कलागुणांना सादर करण्याची संधी यामुळे विद्यार्थ्यांना मिळते, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी, असा उपदेश रमेश धारकर यांनी केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश धारकर होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती गंगाधर कोल्हे, मुख्याध्यापक कल्पना मोरे, उपमुख्याध्यापक राजू वरके, पर्यवेक्षक संभाजी घाटुर्ले, श्रद्धा घोडवैद्य, संयोजक संजय नावाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरे यांनी केले. विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव देण्याची संधी या कार्यक्रमातून मिळते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेचे महानायक तन्मय मुडे, उत्सव नायक प्रसाद चौधरी, क्रीडा नायक आदित्य जुमडे यांनी उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्परचना स्पर्धा, अपूर्व विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन गजानन सयाम यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक रा.वि. वरके यांनी मानले. कार्यक्रमाला संचालक मंडळाचे सदस्य बळवंत वाघे, शरद मुरसे, भीमसागर खैरकार व शहरातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर केले. महित्सवार सहभागी स्पर्धकांना बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.