वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वाटले तांदूळ आणि कडधान्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:56 PM2020-04-01T16:56:57+5:302020-04-01T16:58:13+5:30
कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पोषण आहारातील शिधा शिल्लक असल्याने त्याचे वितरण वर्धा जिल्ह्यातील केळझरच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पोषण आहारातील शिधा शिल्लक असल्याने त्याचे वितरण वर्धा जिल्ह्यातील केळझरच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
शाळा बंद आहेत आणि परीक्षाही रद्द झाल्या आहेत. विद्यार्थी आपापल्या घरी मग्न आहेत. अशात शाळेत शिल्लक असलेल्या पोषण आहाराच्या शिध्याबाबत शासनाने तो शिधा विद्यार्थ्यांमध्ये वाटला जावा असा आदेश काढला. त्यानुसार येथील जि. प. शाळेतील विद्याथ्यांना शाळेत बोलावण्यात आले. कोरोनाची प्राथमिक माहिती देण्यात आली व घ्यावयाच्या सूचना सांगण्यात आल्या. यावेळेस त्यांना तांदूळ व कडधान्ये वितरीत करण्यात आली. वितरणाच्या वेळी सुरक्षित अंतर राखूनच विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले होते..