पुलगावचे दुय्यम निबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात

By Admin | Published: July 8, 2016 02:07 AM2016-07-08T02:07:32+5:302016-07-08T02:07:32+5:30

मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरण स्थानिक दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात नोंदणी केल्याशिवाय वैध ठरत नाही;

The sub-registrar office of Pulgaon is in doubt | पुलगावचे दुय्यम निबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात

पुलगावचे दुय्यम निबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात

googlenewsNext

खरेदी-विक्रीप्रकरण : तीन प्रकरणांत गोंधळ; चौकशी केल्यास अनेक प्रकरणांचा उलगडा
पुलगाव : मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरण स्थानिक दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात नोंदणी केल्याशिवाय वैध ठरत नाही; परंतु गत काही वर्षांत या कार्यालयात बोगस नोंदणी करण्यात आल्याची तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामुळे सदर कार्यालयाची कार्यपध्दती संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
येथील बालाजी मंदिर देवस्थानच्या मालमत्तेची परस्पर विक्री प्रकरणात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल देत प्रथम केलेले तथाकथित विक्रीपत्र बोगस व बनावट असल्याचा ठपका ठेवला. त्या आधारे नोंदविलेले फेरफार रद्द करून दावा जमिनीस बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्ट नाव लावण्यात यावे, असा निर्णय एप्रिल २०१६ मध्ये दिला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना विचारलेल्या माहिती संदर्भात दुय्यम निबंधक श्रेणी-१, पुलगाव यांनी ४ एप्रिल २०१६ रोजीच्या पत्रान्वये दावा जमिनीबाबत नोंदविलेला दस्त क्रमांक ३३१/२००० ची नोंद कार्यालयाकडून केलेली नसल्याचे लेखी कळवून आपल्या कार्यालयाचे पितळ उघडे पाडले. यामुळे कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अशी एक नाही तर तीन प्रकरणे उघडकीस आली आहे. या प्रकरणी योग्य प्रकारे चौकशी झाल्यास काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या नागपूर मुंबई या द्रुतगती मार्गावरील मौजा गुंजखेडा येथील ५.६० हेक्टर जमिनीची परस्पर विक्री २ मे २००० रोजी सुनीता देशमुख व राजेश देशमुख यांच्या नावे करण्यात आली. ही बाब मार्च २०११ मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या विक्री पत्राचेवेळी उघड झाली. त्यामुळे सदर ट्रस्टने माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या आधारे जिल्हाधिकारी वर्धा व पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनीही या प्रकरणात गुन्हा दाखल करून काहींना अटक करण्यात आली होती.

Web Title: The sub-registrar office of Pulgaon is in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.