विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

By Admin | Published: September 25, 2016 02:02 AM2016-09-25T02:02:53+5:302016-09-25T02:02:53+5:30

घरगुती कारणावरून विवाहितेने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये उघडकीस आली.

Suicide by marrying a married man | विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

googlenewsNext

वडिलांचा आरोप : प्रणिताची आत्महत्या नसून हत्याच
समुद्रपूर : घरगुती कारणावरून विवाहितेने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये उघडकीस आली. प्रणिता श्याम भाजीपाले (२०) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्रणिताचे एप्रिल महिन्यामध्ये श्याम भाजीपाले याच्यासोबत विवाह झाला होता. मुलीच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मुलीला समुद्रपूरलाच आणून तिच्या कुटुंबियांनी तिचे लग्न लावून दिले होते. व्यवस्थित संसार सुरू असतानाच तिला डोक्याचा त्रास सुरू झाला. त्याबाबत तिच्याचर उपचार सुरू होता. यातूनच घरगुती वाद होणे सुरू झाले. श्याम हा आईवडीलाच्या शेजारी खोलीत राहत होता. त्यामुळे तिचे त्याच्या आई-वडिलांशी विशेष संबंध नव्हते. दरम्यान शनिवारी सकाळी श्याम हा डीश टी.व्हीच्या फिटींगसाठी बाहेर गावी गेला असताना प्रणिताने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. तो घरी पोहचला असता त्याला सदर प्रकार कळला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला. पुढील तपास ठाणेदार प्रविण मुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन मराठे, अशोक चंहादे, अमोल खाडे, अशोक जैस्वाल करीत आहे. सदर घटनेमागे घातपात असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला असून त्याची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. असे असले तरी या संदर्भात सायंकाळपर्यंत कुठलीही तक्रार केली नव्हती.(तालुका प्रतिनिधी)

माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्रीच मुलीने मला फोन करून खूप त्रास असल्याचे सांगितले होते.
- राजू बापुराव कोपरकर, मृतकाचे वडील, रा. गोंडा, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ.

Web Title: Suicide by marrying a married man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.