ग्रामीण भागात उन्हाळवाहिला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:52 PM2018-03-18T23:52:31+5:302018-03-18T23:52:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : पऱ्हाटीची उलंगवाडी झाली असली तरी काही प्रमाणात शेतात कापूस आहेच. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पऱ्हाटी उत्पादकांना जबर फटका बसला. येत्या वर्षांत या बोंडअळीचा प्रभाव कायम राहू नये याकरिता असलेली पऱ्हाटी जाळून त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रकार शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीदरम्यान करण्यात येत आहे. येत्या कडक उन्हात मातीत असलेल्या अळ्या इतर किडे मरतील असा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे.
विदर्भातील पांढरे सोने अशी कापसाची ओळख आहे. पण गत काही वर्षांपासून कापूस शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसते. याला सरकार, शासन यांच्या धोरणा बरोबर बळीराजाचा सरकार वरील विश्वास कारणीभूत ठरला. नविन बियाणे, खते व किटकनाशके यातून अनेक नुकसानादायी घटना यंदाच्या वर्षांत घडल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी पऱ्हाटी काढण्याच्य कामाला प्रारंभ झाला आहे. तर बऱ्याच शेतात अजूनही कापूस असून शेतकºयांची मजुरीकरिता भटकंती सुरू आहे. शेतकरी हा अनुभवी आहे.
यंदाच्या हंगामात बोंड अळीपासून धोक्याची कल्पना लक्षात आली. उलंगवाडी होताच पºहाटी काढणे, ढिग लाऊन ते जाळणे सुरू केली आहे. नांगरणी दिवसाला केल्यास ऊन्हाची दाहकता आणि पक्षांमुळे अळ्यांच्या कोषचा नायनाट होईल, असा दुहेरी फायदा लक्षात घेऊन शेतकरी कामाला जुंपला आहे. हमदापूर, वघाळा आदी शिवारात पराटी जमा करणे, पेटवणे आणि नांगरणीची कामे आणि यात पक्षी अळ्या खातांना दिसत आहे.