सुनील टालाटुलेशी भाजप व संघाचा संबंध नाही

By admin | Published: March 10, 2016 02:55 AM2016-03-10T02:55:56+5:302016-03-10T02:55:56+5:30

सुनील टालाटुले या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या कापसाचे आठ कोटींचे चुकारे दिले नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

Sunil Talatulei is not concerned with the BJP and the Sangh | सुनील टालाटुलेशी भाजप व संघाचा संबंध नाही

सुनील टालाटुलेशी भाजप व संघाचा संबंध नाही

Next

रामदास तडस : जिल्हा बँक बुडविणाऱ्यांनी शेतकरी हिताचा देखावा करु नये
वर्धा : सुनील टालाटुले या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या कापसाचे आठ कोटींचे चुकारे दिले नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. याप्रकरणी पीडित शेतकरी नागपुरात उपोषणावर बसलेले आहे. या प्रकरणात काँग्रेसकडून भाजप व संघाला निशाना केला जात असताना खा. रामदास तडस यांनी यात उडी घेऊन जिल्हा बँक बुडविणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी शेतकरी हिताचा देखावा करु नये, अशा शब्दात शरसंधान साधून सुनील टालाटुलेशी भाजप व संघाचा तीळमात्र संबंध नसल्याचा खुलासाही केला आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.
सेलूची सूत गिरणी सुनील टालाटुले यांची खासगी मालकीची आहे. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करतात. गेल्या ३-४ वर्षा$ंपासून त्यांनी कापसाचे पैसे न दिल्याने शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे त्यांनी द्यायलाच पाहिजे होते.
भाजप या प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या बाजूने सुरूवातीपासूनच आहे. या प्रश्नासाठी गिरणी मालक व शेतकरी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्यात. प्रश्न सुटावा, यासाठी भाजप संघटनमंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष राजू बकाने व माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्यासह प्रयत्न केलेत. मात्र जिनिंग मालकाची संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी गहाण असून तो कर्जबाजारी असल्यामुळे प्रश्न सुटू शकला नाही, ही बाबही खा. तडस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केली आहे.
काही काँग्रेस मंडळी राजकारण करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत राजकीय पोळी भाजून घेत आहेत. हा प्रकार निषेधार्थ आहे. ज्या काँग्रेसी मंडळींनी वर्धा जिल्हा बँक भस्मसात करून बुडविली. शेतकऱ्यांना लुबाडले आता शेतकऱ्यांबद्दल खोटा कळवळा दाखवून विनाकारण संघ व भाजपाला बदनाम करीत असल्याचा आरोपही खा. तडस यांनी केला आहे.
आमची बांधलकी शेतकऱ्यांसोबत असून त्यांचे पैसे मिळावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काँग्रेस नेत्यांच्या चालबाजीला बळी पडू नये व प्रश्न विनाकरण चिघळवू नये. कायदेशीर मार्गाने शासनस्तरावर शक्य ती मदत करण्यास सरकार तयार आहे.
काँग्रेस नेत्यांनी जिल्हा सहकारी बँक बुडविली असताना त्या बँकेला ना. नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी ५० कोटी मिळवून दिले आहेत, असा टोलाही रामदास तडस यांनी लगावला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Sunil Talatulei is not concerned with the BJP and the Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.