वर्ध्यातील स्फोटाची पोलीस अधिक्षकांकडून पाहणी, श्वान पथकही बोलावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:06 PM2022-07-30T23:06:01+5:302022-07-30T23:06:58+5:30

शहरातील वंजारी चौक परिसरात सुरेश वंजारी यांच्या घरी स्फ़ोट झाल्याची घटना सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली.

Superintendent of Police inspected the explosion case in Wardha | वर्ध्यातील स्फोटाची पोलीस अधिक्षकांकडून पाहणी, श्वान पथकही बोलावलं

वर्ध्यातील स्फोटाची पोलीस अधिक्षकांकडून पाहणी, श्वान पथकही बोलावलं

Next

वर्धा : 

शहरातील वंजारी चौक परिसरात सुरेश वंजारी यांच्या घरी स्फ़ोट झाल्याची घटना सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. शहरात उलट सुलट चर्चा होत असतानाच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी घटनास्थळी भेट देत घराची पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड उपस्थित होते.
 
शहरातील वंजारी चौक परिसरात सुरेश वंजारी यांच्या घरी सायंकाळच्या सुमारास स्फोट झाला. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच वंजारी चौक परिसरात नागरिकांची गर्दी उसळली. नेमका स्फोट  कशाचा याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक हेमंत सांधेवारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. रात्री. साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण घराची पाहणी केली. पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधला. पासपोर्ट गॅस गळतीमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

घटनास्थळी शानपथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर हे स्वतः निरीक्षण करीत होते.

Web Title: Superintendent of Police inspected the explosion case in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.