मराठा आंदोलनाला युवा स्वाभिमानचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:25 PM2018-07-27T22:25:22+5:302018-07-27T22:26:45+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने पाठींबा देण्यात आला आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास २ आॅगस्ट रोजी आर्वी येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने पाठींबा देण्यात आला आहे. याबाबत तोडगा न निघाल्यास २ आॅगस्ट रोजी आर्वी येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी युवा स्वाभिमान पार्टीचे मराठा समाज संघटक शंकर हत्तीमारे व सचिव राजू बोरकुटे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यात मराठा समाज आरक्षण आंदोलनाचा पाठिंबा जाहीर करून आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवून समाजाला न्याय द्यावा,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना दिलीप पोटफोडे,नितीन मनवर, कमलेश चिंधेकर, राहुल विरेकर, राजू राठोड, अन्ना डोंगरे, सुरेंद्र वाटकर, विशाल जाधव, अक्षय काटनकर, रवी वानखेडे, बादल काळे, अमोल विरेकर, अविनाश बेलेकर, देवा सवाई, रोशन लवटे, सिद्धांत कळंबे आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडचे निवेदन
आर्वी- मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न शासनाने त्वरित निकाली काढावा या मागणीबाबत संभाजी ब्रिगेड, आर्वीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रफुल्ल क्षिरसागर, संतोष डंबारे, सुरजित अकली, संकेत जाचक., आशिष खंडागळे, विशाल येलेकर, चेतन जगदळे, अमर खोपे उपस्थीत होते. या निवेदनात काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला शासनाने ५० लाख रुपयांची मदत व त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी केली.