लिपिकावर निलंबनाची कारवाई
By admin | Published: May 12, 2016 02:25 AM2016-05-12T02:25:56+5:302016-05-12T02:25:56+5:30
अफरातफर प्रकरणात शनिवारी जिल्हा परिषद प्रशासनाने लिपिकाच्या निलंबनाचा आदेश दिला.
अफरातफर प्रकरण : कुटुंंबाकडे आदेश तामिल
समुद्रपूर : अफरातफर प्रकरणात शनिवारी जिल्हा परिषद प्रशासनाने लिपिकाच्या निलंबनाचा आदेश दिला. सदर आदेश बुधवारी (दि.११) पंचायत समितीच्या लिपिकामार्फत त्याच्या घरी तो स्वत: न मिळाल्याने कुटुंबाकडे तामिल करण्यात आला.
अफरातफरीचे प्रकरण असल्याने सदर लिपिकावर गुन्हा दाखल करण्याकरिता पंचायत समितीने जिल्हा परिषदेला परवानगी मागितली होती. यावरून मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनाने परवानगी दिली.
तत्सम तक्रार समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी गेले असता तक्रारीमध्ये त्रोटक माहिती आहे. त्यात संपूर्ण २४ महिन्यांची माहिती आणा. त्यानंतर तक्रार घेऊ, असे सांगितले. यामुळे पोलीस ठाण्यात गेलेले गटशिक्षणाधिकारी नासीर अहमद व विस्तार अधिकारी एस.के. हेडाऊ यांना परत यावे लागले.
सदर लिपिकावर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत संपूर्ण माहिती बाहेर येणार नाही. यावर जिल्हा परिषद पुढे काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)