जि.प.सीईओंकडून मुख्याध्यापकाचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:11 PM2017-12-06T23:11:29+5:302017-12-06T23:12:21+5:30

मनमर्जी काम चालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गवंडी येथील शाळेतील मुख्याध्यापक पा. ला. राठोड यांना जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना मुंडे यांनी निलंबित केले आहे.

Suspension of Headmaster from ZP CEO | जि.प.सीईओंकडून मुख्याध्यापकाचे निलंबन

जि.प.सीईओंकडून मुख्याध्यापकाचे निलंबन

Next
ठळक मुद्देयावले विरुद्धही पाठविला प्रस्ताव : गवंडीच्या शाळेतील मनमर्जी प्रकार भोवला

आॅनलाईन लोकमत
कारंजा (घा.) : मनमर्जी काम चालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गवंडी येथील शाळेतील मुख्याध्यापक पा. ला. राठोड यांना जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना मुंडे यांनी निलंबित केले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जि. प. च्या स्थायी समितीच्या बैठकीत गवंडी शाळेमध्ये ४ डिसेंबरला उजेडात आलेल्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या गैरहजेरीचा व त्यांच्या खुर्चींना संतप्त ग्रामस्थांनी चपलांचा हार घातल्याचा विषय चांगलाच रंगला. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकारची माहिती जि. प. सदस्य राणा रनणवरे यांनी मांडला. त्याची दखल तातडीने घेऊन अध्यक्ष नितीन मडावी यांनी निलंबनाच्या आदेश निर्गमित करण्याचे सुचविले. गवंडी येथील मुख्याध्यापक, शिक्षक यांची अनेक तक्रार सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर अनेक तक्रारी झाल्या. ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी लेखी बयान नोंदविले होते. पालकांच्यावतीने लेखी तक्रार पं. स. शिक्षण विभागाकडेही करण्यात आली होती; पण कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे येथील मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला होता. अखेर सोमवारी ग्रामस्थांच्या सहनशिलतेचा बांध फुटला. त्याची दखल घेत मुख्याध्यापक राठोड यांना निलंबित केले आहे. तर गंगाधर यावले यांच्याही निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. जि.प. अध्यक्ष मडावी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वास्तव स्थिती जाणून घेतली. यावेळी गट विकास अधिकारी सातघरे, गट शिक्षणाधिकारी बी. टी बोलणे हजर होते.
लोकप्रतिनिधींनी गाठली गवंडीची जि.प. शाळा
जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, समाजकल्याण सभापती नीता गजाम, पं. स. सभापती मंगेश खवशी, जि.प. सदस्य सरिता गाखरे, सुरेश खवशी, रेवता धोटे, पं. स. सदस्य रोशना ढोबाळे यांनी शाळा गाठून विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी सरपंच सुशीला चौधरी, पंकज धारपुरे, जगन चौधरी, हेमंत किनकर, यादव बनगरे, रवी बमनोटे नागोराव उकल्ले यांची उपस्थिती होती.
अध्यक्षांसमोर विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढा
बुधवारी शाळेला सुट्टी असताना जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी गवंडी शाळा गाठून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जि.प. शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आले असताना त्यांनी शाळेतील शिक्षक काय करतात याचा पाढाच यावेळी जि.प. अध्यक्ष मडावी व संबंधितांसमोर वाचला. जि.प. सदस्य सरिता गाखरे यांनी वारंवार याची माहिती मुख्याधिकारी, शिक्षण सभापती यांना दिली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. याकडे लक्ष दिले असते तर संतप्त ग्रामस्थांनी थेट शिक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार टाकला नसता. असे यावेळी सांगण्यात आले. जि.प. सदस्य गोखरे यांच्या विनंतीला मान देत जि.प. अध्यक्षांनी शाळा गाठली.
शिक्षकावरही निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन
जि.प.ची शाळा गाठणाºया जि. प. अध्यक्षांसह संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर मुख्याध्यापावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तक्रारी प्राप्त झाल्याने शिक्षकावरही निलंबनाच्या कार्यवाहीचे आश्वासन यावेळी दिले.

Web Title: Suspension of Headmaster from ZP CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.