सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

By admin | Published: April 11, 2017 01:20 AM2017-04-11T01:20:12+5:302017-04-11T01:20:12+5:30

सूर्य दिवसभर आग ओकत असल्याने सतत उष्णतामानात वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडलेले दिसतात.

Sustained electricity supply to civilians suffer | सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

Next

उकाड्यात भर : भारनियमनाचे वेळापत्रक आवश्यक
पुलगाव : सूर्य दिवसभर आग ओकत असल्याने सतत उष्णतामानात वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडलेले दिसतात. या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कुलर वापरात काढले आहे. मात्र काही दिवसांपासून वीज वितरणकडून वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित केल्या जात आहे. त्यामुळे शहर वासियांनी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शासन कोणतेही असले तरी भारनियमनातून मुक्तता होत नसल्याचा प्रत्यय आजवर नागरिकांना आला आहे. निवडणूक काळात केलेली घोषणा हवेतच विरते. काही वर्षांपूर्वी स्थानिक पातळीवर विद्युत विभागाने वीजगळती कमी करुन विजेची बचत केल्यास्तव शहरातील भारनियमन कमी केले होते. त्यामुळे शहरवासियांना काहीकाळ दिलासा मिळाला होता. परंतु मागील काही दिवसांपासून वेळीअवेळी आणि तासन्तास वीज पुरवठा खंडित केल्या जात आहे.
रखरखत्यात उन्हापासून जीव वाचविण्यासाठी नागरिक कुलरच्या हवेत आराम करण्याचा बेत आखतात. मात्र वीज पुरवठा खंडित केल्या जात असल्याने नागरिकांना ऐन उन्हाच्या वेळेत उकाडा सहन करावा लागतो. यात भरीसभर म्हणून सायंकाळच्या वेळी वीज पुरवठा खडित करण्यात येत आहे.
सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम शेतीवर होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागात तर भारनियमन अधिक वेळेकरिता केले जाते. शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. शेतमालास योग्य प्रमाणात पाणी देता येत नसल्याचे भाजीपाला व उन्हाळी पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. वेळापत्रकानुसार भारनियमन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. एकीकडे शासन कर्जमाफी देत नाही, तर दुसरीकडे पीक कसे जगवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅकेचे कर्ज काढुन पेरणी केल्यावर पाण्याअभावी उभे पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. हा प्रकार शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात लोटण्यासारखा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
रखरखत्या उन्हातही खंडित होत असलेला वीज पुरवठ्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे. ठराविक वेळेत भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी आहे. वीज वितरण लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)

पाणी पुरवठा होतो प्रभावीत
सकाळी होणाऱ्या भारनियमानामुळे शहराचा पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. पाण्याची टाकी भरत नसल्याने ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहे.
उत्पादन चांगले या आशेवर शेतकरी असतानाच वेळीअवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्याव लागते आहे. आणिी असताना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पीक वाळत आहे.

Web Title: Sustained electricity supply to civilians suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.