ईव्हीएमची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

By admin | Published: March 11, 2017 12:34 AM2017-03-11T00:34:22+5:302017-03-11T00:34:22+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये गोंधळ

The symbolic funeral of EVM | ईव्हीएमची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

ईव्हीएमची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

Next

आर्वीत सर्वपक्षीय मोर्चा : रस्त्यावर तहसीलदारांना निवेदन
आर्वी : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. यामुळे शुक्रवारी आर्वीत या मुद्यावर भाजप वगळता ईव्हीएमचा विरोध करीत सर्व पक्षांनी एकत्र येत या मशीनची प्रतिकात्मक पे्रतयात्रा काढली. मोर्चाद्वारे यावेळी बॅलेट पेपरवर निवडणूक पद्धती अंमलात आणण्याची मागणी लावून धरली.
आर्वीत आयोजित या सर्वपक्षीय मोर्चाचा प्रारंभ दुपारी १ वाजता झाला. हा मोर्चा सिव्हील लाईन गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदार विजय पवार यांना इव्हीएम मशीनची पद्धत बंद करून बॅलेट पेपर निवडणूक घेण्याच्या मागणीचे सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.
या निवेदनात आर्वीत झालेल्या नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या मोर्चात इव्हीएम हटवा लोकशाही वाचवा, हुकूमशाही बंद करा आदी नाऱ्याचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती देण्यात आले होते. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करुन येणारी निवडणूक बॅलेटच्या पद्धतीने करण्याची मागणी मोर्चात सहभागी पक्षांच्या प्रमुखांनी केली. या मोर्चाचे नेतृत्त्व आमदार अमर काळे यांनी केले.
मोर्चानंतर शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. लोकशाहीत मतदान चोरीचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप आ. अमर काळे यांनी केला. पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करून भाजपाने ही निवडणूक जिंकल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने संदीप काळे, शिवसेनेच्यावतीने निलेश देशमुख, बसपाचे सुनील डोंगरे, पिरीपाचे मेघराज डोंगरे, युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे आदींनी विचार व्यक्त केले. प्रत्येकाने ईव्हीएमच्या घोळाची चौकशीची करण्याची मागणी केली.
सभेचे संचालन करीत प्रा. पंकज वाघमारे यांनी आभार व्यक्त कले. या मोर्चात काँग्रेस, बसपा, राकाँ, पीरिपा, युवा स्वाभिमान, शिवसेना, प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होतीे. यावेळी तालुक्यातील महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.(तालुका/शहर प्रतिनिधी)

त्या घटनेचा निषेध
आर्वीत दोन दिवसांपासून भाजपा आणि प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांत वाद उफाळला आहे. प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप हे घटनेच्यावेळी हजर नसतानाही केवळ राजकीय आकसापोटी व पोलीस विभागावर दबाव आणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचाही यावेळी आ. काळे यांनी निषेध नोंदविला.

 

Web Title: The symbolic funeral of EVM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.