राज्य सरकारच्या आश्वासनाची प्रतिकात्मक तिरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:30 PM2017-09-18T23:30:00+5:302017-09-18T23:30:29+5:30

महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कामगार संघटनेच्या शेकडो महिलांनी स्थानिक ठाकरे मार्केट चौकातून सोमवारी वर्धा शहरात मोर्चा काढला.

The symbolic skull of the state government's promise | राज्य सरकारच्या आश्वासनाची प्रतिकात्मक तिरडी

राज्य सरकारच्या आश्वासनाची प्रतिकात्मक तिरडी

Next
ठळक मुद्देमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी : वर्ध्यात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कामगार संघटनेच्या शेकडो महिलांनी स्थानिक ठाकरे मार्केट चौकातून सोमवारी वर्धा शहरात मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारने आजवर दिलेल्या आश्वासनाची तिरडी त्यांच्याकडून काढण्यात आली. ही तिरडी पोलिसांनी मोर्चाच्या प्रारंभीच जप्त केली. यावेळी महिलांनी शासनविरोधी चांगल्याच घोषणा दिल्या.
महिलांनी पंतप्रधान केंद्रीय महिला बालविकास मंत्री व राज्याच्या महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली. आठही तालुक्यातील व शहरी भागातील ५०० वर अधिक अंगणवाडी सेविका या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व नगरसेवक यशवंत झाडे व अंगणवाडी महिला संघटनेच्या अध्यक्ष आयशा शेख यांनी केले. हा मोर्चा मुख्य मार्गावरून जिल्हा परिषदेवर पोहचला. येथे विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाºयांना सादर करण्यात आले.
या निवेदनात शासनाच्या अनेक योजनांची पोलखोल अंगणवाडी सेविकांनी केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी टीएचआर आहार आरोग्याच्या दृष्टीने कुचकामी ठरत असल्याचा आरोप केला आहे. हा आहार केवळ राजकीय नेत्यांच्या कमिशनपोटी देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात सहभागी महिलांनी त्यांना होत असलेल्या त्रासाचीही ग्वाही दिली. शिवाय मिळालेल्या आश्वासनाचाही निषेध नोंदविला.
यावेळी विजया पावडे, वंदना कोळणकर, असलम पठाण, गजेंद्र सुरकार, गणुवंत डकरे, ज्ञानेश्वरी डंभारे, मैना उईके, मंगला इंगोले, विमल कौरती, सुनंदा आखाडे, शोभा तिवारी, रेखा काचोळे, माला भगत, बबीता चिमोटे, ज्योती कुलकर्णी, वंदना बाचले, प्रज्ञा ढाले, माला कुत्तरमारे, शोभा सायंकार, सीमा गढीया, रंजना तांबेकर, सुरेखा रोहणकर, देविका शेंडे, सुनिता टिपले, सुनिता भगत, अंजली बोंदाडे, यमुना नगराळे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने सेविकांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) यशवंत झाडे, भैय्या देशकर, सिताराम लोहकरे, रंजना सावरकर, अर्चना मोकाशी, कल्पना चहांदे, गुंफा कटारे यांचाही सहभाग होता.

सेविकांच्या मागण्या
अंगणवाडी कर्मचाºयांना जुन ते आॅगस्ट महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. एक वर्षापासून प्रवास भत्ता मिळालेला नाही. शासन निर्णयाप्रमाणे जनश्री विमा योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. दोन वर्षांपासून अंगणवाडी केंद्रासाठी लागणारी स्टेशनरी देण्यात आलेली नाही. अंगणवाडी केंद्राची वेळ निश्चित केलेली नाही. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील आहाराचे बिल जानेवारी १७ पासून मिळाले नाही. अशा विविध मागण्या प्रलंबित आहे. जोपर्यंत शासन व जिल्हास्तरावरील मागण्या निकाली निघेपर्यंत जिल्ह्यातील अंगणवाड्या आहारासहीत बंद राहतील याची नोंद घ्यावी.

Web Title: The symbolic skull of the state government's promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.