दहेगाव (मि.) वासीयांचा पाण्यासाठी टाहो

By admin | Published: March 5, 2017 12:36 AM2017-03-05T00:36:47+5:302017-03-05T00:36:47+5:30

तालुक्यातील दहेगाव (मिस्किन) येथील गावकऱ्यांना कृत्रिम पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे.

Tahagaon (min) is the name of the tahaha | दहेगाव (मि.) वासीयांचा पाण्यासाठी टाहो

दहेगाव (मि.) वासीयांचा पाण्यासाठी टाहो

Next

ग्रामस्थांनी थांबविले ग्रामपंचायतीचे कामकाज
वर्धा : तालुक्यातील दहेगाव (मिस्किन) येथील गावकऱ्यांना कृत्रिम पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. यामुळे शेकडो ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या व्यवस्थेविरूद्ध शनिवारी आंदोलन पुकारून कार्यालयाला घेराव करीत ग्रामपंचायतचे कामकाज बंद पाडले.
दहेगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत मुबलक पाणी असून सदर विहीर गत अनेक वर्षांपासून उपयोगात आणली जात नाही. सदर विहिरीचे पाणी अशुद्ध असल्याचे सिद्ध झाले. यामुळे सदर विहिरीत पाणी उपसा करून नागरिकांना ते पिण्यायोग्य करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. असे असताना ग्रामपंचायतचे सचिव व सरपंचाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गत दोन वर्षांपासून आमला ग्रामपंचायतच्या अधिकारातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासन ग्रामपंचायत आमला प्रशासनासोबत योग्य सहकार्य करीत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी टाहो करण्याची वेळ आली आल्याचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच ग्रामपंचायती ग्रामविकास अधिकारी सावळे हे कायम गैरहजर राहत असल्याने सरपंचाचे पती नितीन गौळकर हेच कारभार पाहत असल्याचा आरोही ग्रामस्थांचा आहे.


ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा
वर्धा : सुरळीत पाणी पुरवठा करण्यास ग्रा.पं. अपयशी ठरल्यास ग्रा.पं. कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारासुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे. आधार संघटना शाखा दहेगाव पदाधिकारी प्रशांत देशमुख, रमेश मोंढे, गजानन ठुने, किशोर अजबैले, देवेंद्र धोटे, प्रकाश येवले, गजानन ठाकरे, मनोज आरगुडे, विठ्ठल बेसेकर, नितीन इमाने, सतीश पाटील, निलेश ढवळे, प्रफुल डबले, वासुदेव पिपराके, अजमद पठाण, विजय कुलधरीया सुरेश तुमडे, गजानन काटोले, सुरेश तुमडाम, सुनील रोहणकर आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: Tahagaon (min) is the name of the tahaha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.