मेळाव्याकडे आमदारांसह नेत्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:20 PM2019-03-12T22:20:35+5:302019-03-12T22:22:55+5:30

भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली. स्वत:च्याच पक्षाच्या आयोजनाला दिलेली बगल पाहता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Tailored by the leaders along with the MLAs | मेळाव्याकडे आमदारांसह नेत्यांनी फिरविली पाठ

मेळाव्याकडे आमदारांसह नेत्यांनी फिरविली पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली. स्वत:च्याच पक्षाच्या आयोजनाला दिलेली बगल पाहता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे.
मेळाव्याला आपसांतील गटबाजीमुळे अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमदार समीर कुणावार, जिल्हा विस्तारक जयंत उर्फ गुंडू कावळे, अर्चना वानखेडे, भाजपचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी यांनी मेळाव्यात येण्याचे टाळले. या घटनाक्रमाने भाजपमधील गटबाजीच्या चर्चेला उधाण आले आहे.
या मेळाव्यात शहरातील दोन शक्ती प्रमुखापैकी सुनील शेंडे हे एकच शक्ती प्रमुख उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश मेंढे, प्रकाश सिरसे, नरेंद्र सेलूकर, नगरसेवक अमोल बोंगाडे, इम्रान पठाण, अमोल गवळी, पंकज पराते, प्रभाकर तुमाणे, अनिल साखळे हे शहरातील १० बूथ प्रमुख आहेत. ते प्रामुख्याने गैरहजर होते. भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे वगळता सरचिटणीस सुनील वाणकर, प्रशांत बोरीकर, संघटक जयंत बडवाईक, कोषाध्यक्ष संजय इटनकर, ओमप्रकाश राठी, मधुकर गुल्हाणे, प्रवीण सिर्सिकर यांनी अनुपस्थित राहून रोष व्यक्त केला.
भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका अजया साखळे, बांधकाम सभापती बबिता तुमाणे, वंदना सेलूकर, पुष्पा सिरसे, चंदा बोरकर, अमोल बोंगाडे, प्रकाश मेंढे या भाजपच्या नगरसेवकांनीही मेळाव्याकडे पाठ फिरविली. या मेळाव्यात १६ कार्यकर्ते, नगराध्यक्ष संगीता शेंडे, उपाध्यक्षा वंदना डकरे, भाजपचे विस्तारक पवन परियाल, शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे यांचीच उपस्थिती होती.
हॉलमध्ये प्रमुख पाहुण्यांकरिता लावलेला स्टेज संख्येअभावी खाली घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. या सर्व घटनेची माहिती आमदार समीर कुणावार यांना मिळाल्याने मेळाव्याचे प्रमुख असूनही ते इकडे फिरकले नाही.
भाजपची नगरपालिकेत सत्ता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवक, शहरातील पतसंस्था, सोसायट्यांमध्ये पक्षाचे अनेक संचालक आहेत. पक्षाच्या विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लांबच लांब फळी असतानाही मेळावा अपयशी ठरला. सध्या सभोवतालच्या २५ पेक्षा अधिक गावांत ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशा स्थितीत भाजपातील दुफळी चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: Tailored by the leaders along with the MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा