आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:46 PM2019-06-21T23:46:10+5:302019-06-22T00:02:16+5:30

आर्वी येथील सात वर्षीय चिमुकल्यावर चोरीचा ठपका ठेऊन त्याच्यावर शारिरीक अत्याचार करणाऱ्या आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे याच्यावर यापूर्वीही दारूबंदी कायद्यान्वे गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

Take action on the accused under MCA | आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई करा

आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई करा

Next
ठळक मुद्देविविध संघटनांचा निषेध मोर्चा : आर्वीच्या चिमुकल्याला न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी येथील सात वर्षीय चिमुकल्यावर चोरीचा ठपका ठेऊन त्याच्यावर शारिरीक अत्याचार करणाऱ्या आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे याच्यावर यापूर्वीही दारूबंदी कायद्यान्वे गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. सदर मागणीसह विविध मागण्यांसाठी तसेच या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून दुपारी १ वाजताच्या सुमारास निघालेल्या या मोर्चाने २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले. आर्वी येथील घटना मानुसकीला काळीमा फासणारी असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी. आरोपी अमोल ढोरे याच्याविरुद्ध यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल आहेत. शिवाय तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. या प्रकरणात एकच आरोपी नसून पोलिसांनीही सखोल चौकशी करून इतर आरोपींनाही हुडकून काढत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. सदर मोर्चात मातंग समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे, महिला अध्यक्षा हिरा खडसे, भिमराव डोंगरे, संजय तिरळे, चेतना कांबळे, दिलीप पोटफोडे, किशोर वाघमारे, अक्षय अहिव, दिगांबर सनेसर, मनोहर डोंगरे, मारोती फोडेकर, आशा बावणे, गजू मुंगले, अमोल गायकवाड, गजानन खंडारे यांच्यासह बहूजन रयत परिषद, भिम आर्मी, युवक काँग्रेस तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Take action on the accused under MCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.