दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:18 AM2018-04-21T00:18:55+5:302018-04-21T00:18:55+5:30

तालुक्यातील बेलगाव परिसरातील एका दिव्यांग मुलीवर १३ एप्रिलला तीन जणांनी अतिप्रसंग केला. हा प्रकार निंदनिय असून सदर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.

Take action against superstar Sanjay Davyange | दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्यांवर कारवाई करा

दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्यांवर कारवाई करा

Next
ठळक मुद्देमागणी : माया इवनाते यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कारंजा (घा.) तालुक्यातील बेलगाव परिसरातील एका दिव्यांग मुलीवर १३ एप्रिलला तीन जणांनी अतिप्रसंग केला. हा प्रकार निंदनिय असून सदर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांना सादर केले आहे.
पीडिता ही दुपारच्या वेळेस प्रात:विधीकरिता गेली असताना त्याच गावातील तीन युवकांनी तिचा पाठलाग करीत तिला जबरी गोठ्यात नेत तिच्यावर अतिप्रसंग केला. सुरूवातीला पीडिता ही घाबरली असल्याने तिने घटनेची माहिती कुणालाही दिली नाही. परंतु, काही प्रत्यक्षदर्शियांनी मुलीच्या भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर १८ एप्रिलला या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात गावातील मंडळीसोबत तक्रार दाखल करण्यास पीडिता गेली असता तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. दिवसभर तक्रार देण्यास ताटकळत ठेवल्यानंतर सायंकाळी सायंकाळी ६ वाजता तक्रार घेण्यात आली. सदर प्रकरणी तक्रार घेते वेळी आरोपींविरुद्ध बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त असताना केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी सुरूवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. त्यामुळे पीडितेला न्याय मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, तसेच कामात हयगय करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनाही देण्यात आली आहे. निवेदन देताना प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्ह्य अध्यक्ष प्रमोद कुरटकर, हनुमंतराव झोटिंग, नितेश चतुरकर, राजेश सावरकर, विजय सुरकार, सुनील मिश्रा, शैलेश सहारे, प्रशिल धंदे हजर होते.

Web Title: Take action against superstar Sanjay Davyange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.