‘त्या’ भ्रष्टाचारी मुख्याध्यापकावर कारवाई करा
By admin | Published: December 28, 2016 01:07 AM2016-12-28T01:07:45+5:302016-12-28T01:07:45+5:30
हिंगणघाट पंचायत समितींतर्गत येत असलेल्या येरला या जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चाफले यांनी
मुख्य क ार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा : हिंगणघाट पंचायत समितींतर्गत येत असलेल्या येरला या जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चाफले यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तत्सम निवदेन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आले होते. यावर चौकशी सुरू झाली; पण त्याचा अहवाल अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाला नाही. यामुळे विभागाच्यावतीने याकडे लक्ष देत या मुख्याध्यापकावर कारवाई करावी, अशी मागणी गावकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन त्यांनी मंगळवारी जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
या मुख्याध्यापकाकडून झालेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करण्याच्या मागणीकरिता गावकाऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर जि.प. कार्यालयामार्फत चौकशी अधिकारी तायडे यांच्याकडे चौकशी सोपविली. या चौकशीमध्ये १७ पालकांचे व वर्गणीदारांचे लेखी बयान घेण्यात आले आहे. या चौकशीला एक महिन्याचा कालावी लोटला. परंतु, सदर मुख्याध्यापकावर प्रशासनामार्फत अजून पर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
याउलट सदर मुख्याध्यापकास कारवाईपासून जि.प. प्रशासनाकडून वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या पालकांकडून करण्यात आला आहे.
चौकशीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी सदर मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्याबाबतचा अहवाल सादर केला नाही. यामुळे या प्रकरणात गडबड होण्याची शक्यता असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सदर प्रकारामुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर पाणी व शालेय पोषण आहार या पासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. निवेदन देतेवेळी मिलिंद वागदे, जयवंता पंधरे, मारोती ताजने, विनोद वानखेडे, गुलाबराव पंधरे उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)