सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:15 AM2018-09-09T00:15:32+5:302018-09-09T00:16:16+5:30
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या वरील एटीएसने उघड केलेल्या हल्ल्याच्या कटाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या वरील एटीएसने उघड केलेल्या हल्ल्याच्या कटाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. सदर लिखान करणाºयावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याबाबतची तक्रार शनिवारी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सदर तक्रारीतून सामाजिक शांतता भग करण्याऱ्या अश्विन कोल्हे पाटील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अ.भा.अंनिस वर्धाच्यावतीने संघटक रवी पुनसे यांनी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने दिले. मागील ३५ वर्षांपासून प्रा. श्याम मानव हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. एटीएसने उघड केलेल्या प्रा. श्याम मानव यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या कटाची बातमी किशोर वाघ यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून व्हायरल केली होती. त्या बातमीवर हल्ल्याचे समर्थन करणारी प्रतिक्रिया आश्विन कोल्हे पाटील यांनी दिली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर करवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. सदर तक्रार सादर करताना पंकज वंजारे, निलेश गुल्हाणे, संगीता इंगळे तिगावकर, पी. के. खोबे, संजय जवादे, आशीष मोडक, पराग दंडगे, आशीष नंदनवार, सूरज बोदिले, सूरज गणवीर, स्वप्निल मोडक, सचिन देवगिरकर, सुमीत उगेमुगे, निखिल खोडे, निखिल अंम्बुलकर यांच्यासह अ.भा.अनिसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.