नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:44 PM2018-01-12T23:44:27+5:302018-01-12T23:45:12+5:30

उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या नायलॉनच्या मांजाची शहरात सर्रास विक्री होत आहे. ही खरेदी-विक्री थांबवावी. नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण बचाव समितीमार्फत करण्यात आली. यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Take action on the Nylon menswear shoppers | नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा

googlenewsNext
ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या नायलॉनच्या मांजाची शहरात सर्रास विक्री होत आहे. ही खरेदी-विक्री थांबवावी. नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण बचाव समितीमार्फत करण्यात आली. यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मकर संक्रांतीच्या सणापासून शहरात लहान मुले व युवक हे पतंग उडवित असतात. पतंग उडविण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वास्तविक, उच्च न्यायालयाने नायलॉनच्या मांजापासून उद्भवणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेत यावर बंदी घातलेली आहे. असे असले तरी न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून शहरात खुल्या प्रमाणात नायलॉनच्या मांजाची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. पतंग उडविताना वापरात येणारा हा नायलॉनचा मांजा पतंग उडविणे झाल्यानंतर रस्त्यावर कुठेही फेकून दिला जातो. या मांजामुळे अनेकांचे हात, पाय, मान कापल्या गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. शिवाय पतंग उडवित असताना आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनाही यामुळे इजा होते. यामुळे पर्यावरण बचाव समितीने मांजाची विक्री करणाऱ्यांवर तथा त्याची खरेदी करणाऱ्या युवकांवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून इतर युवक, नागरिक नायलॉन मांजापासून दूर होतील.
याबाबत पर्यावरण बचाव समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रशासनाने याकडे लक्ष देत वेळीच पायबंद घालावा, अशी मागणीही समितीने केली. यावेळी अध्यक्ष शुभम जगताप, उपाध्यक्ष अंकुश जाऊरकर, कोषाध्यक्ष सुरज विरपाचे, योगीराज बोराडे, आकाश ठाकरे, आकाश केने, मयूर शिरभाते, गोलू दारोकर, कुणाल शेवतकर, सार्थक तिवस्कर, गौरव गिते, भाविक दारोकार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Take action on the Nylon menswear shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.