कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतातील उत्पन्न दुप्पट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:35 AM2018-08-26T00:35:50+5:302018-08-26T00:36:19+5:30

विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.

Take advantage of farming schemes and double the yield in the field | कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतातील उत्पन्न दुप्पट करा

कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतातील उत्पन्न दुप्पट करा

Next
ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : गिलगाव येथे शेतकरी दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार कै. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन शेतकरी दिवस म्हणून शुक्रवारी गिलगाव येथे साजरा करण्यात आला. जिल्हास्तरीय या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गिलगावचे सरपंच किरण कोवासे, उपसरपंच पिंपळशेंडे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी वीरेंद्र राजपूत, चंद्रकांत ठाकरे, कृषी पर्यवेक्षक चव्हाण, मेश्राम, कृषी सहायक भैसारे, तरंग शेतकरी उत्पादक कंपनीचे कैलास घोगरे, सचिन सातपुते, सतीश पुरकमवार यांच्यासह गिलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी अनुषंगिक योजनांची कारण मिमांसा केली. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी स्थानिक निविष्ठा तयार करून सेंद्रीय शेती तंत्रज्ञान अवलंबिण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी कष्टाळूवृत्तीने व तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात भात पिकांचे किड व रोग संरक्षण, शेतीतील महिलांचा सहभाग याविषयी उपविभागीय कृषी अधिकारी हिरळकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांना खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
संचालन हेमंत उंदीरवाडे यांनी केले. कार्यक्रमाला गिलगाव, नवरगाव, थाटरी व कोतेगाव परिसरातील ३०० शेतकरी उपस्थित होते.
पूरग्रस्तांसाठी १० हजारांची मदत
भेंडाळा येथील तरंग शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत केरळमधील पूरग्रस्तांसाठी १० हजार रूपयांची मदत करण्यात आली. सदर दहा हजार रूपयांचा धनादेश आ. डॉ. देवराव होळी यांच्या मार्फत उपविभागीय कृषी अधिकारी हिरळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. भेंडाळा, फोकुर्डी, दोटकुली येथील युवक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तरंग शेतकरी उत्पादक कंपनी नुकतीच स्थापन केली. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून या शेतकरी कंपनीतर्फे १० हजार रूपयांची मदत केरळमधील पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आली.

Web Title: Take advantage of farming schemes and double the yield in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.