दुर्बलांच्या बॅँक खात्यातील कपातीला आळा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:23 PM2017-11-04T23:23:12+5:302017-11-04T23:23:22+5:30
बँकेत रक्कम ठेवल्यास ती सुरक्षित राहिल असे वाटत असताना सध्या विविध बँकांकडून शासकीय योजनांचा लाभ घेणाºया दुर्बल घटकांच्या बँक खात्यातून कमी रक्कम ठेवण्यात आल्याचे कारण पुढे करून रक्कमेची कपात केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बँकेत रक्कम ठेवल्यास ती सुरक्षित राहिल असे वाटत असताना सध्या विविध बँकांकडून शासकीय योजनांचा लाभ घेणाºया दुर्बल घटकांच्या बँक खात्यातून कमी रक्कम ठेवण्यात आल्याचे कारण पुढे करून रक्कमेची कपात केली जात आहे. हा प्रकार अन्यायकारक असल्याने त्याला आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेल्याला बँक खात्यात किमान तीन हजार रुपये ठेवणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले जात आहे. सदर रक्कम बँक खात्यात नसल्यास खातेदाराच्या बँक खात्यातून दंडाच्या स्वरूपात ९६ रुपये प्रत्येक महिन्याला कपात करण्यात येत आहे. सदर दंड विविध बँकांमध्ये वेगवेगळा असून त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करीत आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. एकीकडे सरकार नागरिकांना बँक खाते उघडण्याचे व त्याला आधारसोबत जोडण्याचे सांगत आहे. त्यातच हा प्रकार होत असल्याने अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या प्रकाराचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, कामगार, शेतकरी व शेतमजुरांना करावा लागत आहे. जनसामान्य हित लक्षात घेता सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर येत्या काही दिवसात विचार न झाल्यास युवा परिवर्तन की आवाज तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष राहूल दारूणकर, आकाश बोरीकर, रोहण सांडेकर, कुणाल शंभरकर, अमर कांबळे, प्रशांत दरबेसवार, अक्षय वानखेडे, गौरव राऊत, विवेक ठक, विक्की सांडे, दिनेश नगराळे आदींची उपस्थिती होती.