मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:29 PM2018-07-24T23:29:58+5:302018-07-24T23:30:29+5:30

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी कुणबी-मराठा समाजाच्या पुढाऱ्यांसह समाज बांधवांनी एकत्र येत सदर आंदोलनाला पाठींबा म्हणून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.

Take decision of Maratha Reservation immediately | मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या

मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देनिवेदनातून साकडे : महाराष्ट्र बंदला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी कुणबी-मराठा समाजाच्या पुढाऱ्यांसह समाज बांधवांनी एकत्र येत सदर आंदोलनाला पाठींबा म्हणून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.
मंगळवारी दुपारी १ वाजता कुणबी-मराठा समाज बांधवांनी शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात एकत्र येत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र जाचक, समीर देशमुख, भास्कर इथापे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. काकासाहेब शिंदे यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर शहरातून दुचाकी रॅली काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, क्षत्रिय मराठा परिषद आदी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे, सुभाष पाटणकर, जगदळे, पुकराज मापारी, विकास भांडवलकर, अरुण चव्हाण, निलेश फासगे, वामन पवार, प्रशांत जाचक, प्रशांत भोसले, कुणाल मोरे, अमित भोसले, नितीन शिंदे, प्रमोद खंडागळे, पृथ्वीराज शिंदे, लक्ष्मण चौधरी, आशिष शिदे, शेषराव शिंदे, सागर शिंदे, यशवंत गायकवाड, अतुल सावंत, राजेश गिलकर, जयश्री पाठकर, सुनीता सावंत, मेघा खराडे, दिनेश पवार, वामन पवार, केतन मोरे, कुणाल मोरे, अर्चित निघडे, विजय घोडसे, अमित भोसले, रूपेश पाटेळे, दुर्गा जाधव, डी. डी. भोसले आदी सहभागी झाले होते.
शिंदे कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातून सरकारने मराठा समाजाला त्वरित आरक्षण लागू करावे. जम्बो नोकर भरती पुढे ढकलावी. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी. शिंदे कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Take decision of Maratha Reservation immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.