जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्या

By admin | Published: March 13, 2016 02:35 AM2016-03-13T02:35:03+5:302016-03-13T02:35:03+5:30

अल्प पर्जन्यमानामुळे राज्यात पाणीटंचाईची निर्माण झाली आहे. २२ मार्च रोजी असलेल्या जागतिक जलदिनाचे ...

Take initiatives for water conservation | जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्या

जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्या

Next

आशुतोष सलील : जलजागृती अभियान सप्ताह कार्यक्रम
वर्धा : अल्प पर्जन्यमानामुळे राज्यात पाणीटंचाईची निर्माण झाली आहे. २२ मार्च रोजी असलेल्या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून १६ ते २२ मार्च या कालावधीत जिल्ह्यात जलजागृती अभियान सप्ताह राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. येत्या बुधवारी विकास भवनात सकाळी १० वाजता अभियानाला सुरुवात होत आहे,
उद्घाटनपर कार्यक्रमात धाम, बोर, पंचधारा, पोथरा नदीचे जलपूजन करण्यात येणार आहे. राज्य जल व सिंचन आयोगाचे माजी सदस्य डॉ. उल्हास फडके, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. दत्तात्रेय वने पाण्याच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिणा, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, विनेश काकडे, कार्यकारी अभियंता मांडवकर, अधीक्षक अभियंता जयंत गवळी, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, कार्यकारी अभियंता सु. गो. ढवळे, लघुपाटबंधारे विभागाचे अमित मेश्राम, निम्न वर्धाचे रब्बेवार, डॉ. सुभाष टाले उपस्थित राहणार आहे.
वरिष्ठ भूजल वैज्ञानिक नितीन महाजन जिह्यातील पाणी परिस्थिती व नियोजन याविषयावर सादरीकरण सादर करणार आहेत. १७ ते १८ मार्च रोजी विकास भवन येथे औरंगाबादच्या ‘वाल्मी’ मार्फत दोनदिवसीय कार्यशाळा होणार आहे. १७ रोजी आर्वी, देवळी, हिंगणघाट, सेलू आणि वर्धा तालुकास्तरीय जलजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. १८ व १९ रोजी प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, कालवे स्वच्छता, श्रमदान, पाणी वापर संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे.
२० मार्च रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत शहरातून जलजागृती पदयात्रा तर सायंकाळी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची जनजागृती सायकल रॅली काढण्यात येणार आहे. २१ रोजी विभागीय व उपविभागीय स्तरावर विविध स्पर्धा, आयोजित आहे. उपसा सिंचन परवाने वाटप शिबिर देवळी व पुलगाव येथे घेण्यात येणार आहेत. २२ रोजी दुपारी सप्ताहाचा समारोप होणार आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Take initiatives for water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.