प्रेरणा घेत चंपारणमध्ये पुन्हा नयी तालिम रुजवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:47 PM2019-06-17T22:47:46+5:302019-06-17T22:47:58+5:30

ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.

Take inspiration and create new templates in Champaran | प्रेरणा घेत चंपारणमध्ये पुन्हा नयी तालिम रुजवू

प्रेरणा घेत चंपारणमध्ये पुन्हा नयी तालिम रुजवू

Next
ठळक मुद्देहेमनाथ राव : सेवाग्राम येथील शांती भवनातील प्रशिक्षणाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.
नयी तालिम समिती अंतर्गातील आनंदनिकेतन विद्यालयाद्वारे चंपारण जिल्ह्यातील बितीहर्ता केंद्राच्या शिक्षकांसाठी शांतीभवनात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हेमनाथ राव म्हणाले, पूर्ण वातानुकूलित व अत्याधुनिक व्यवस्था असल्याशिवाय कुठलेही प्रशिक्षण चांगल्यारितीने पार पडत नाही, असा समज या ठिकाणी खोटा ठरला आहे. मातीच्या भिंती, कवेलूचे छत अशा इमारतीमध्ये खडू, फळा व उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज करता येईल, अशा उत्पादक कामातून उत्तम शिक्षण दिले जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर मानवीय गुणांची उत्तमरीत्या रूजवण केली जाऊ शकते, हे प्रशिक्षणातून सहजपणे जाणवले. बिहार राज्यात ३५० नयी तालिमची विद्यालये होती. तेथे नयी तालिम पुनर्जीवित करण्याचा बिहार सरकारचा प्रयत्न असल्याचे राव यांनी सांगितले.
नयी तालिम समितीचे मंत्री प्रा.प्रदीप दासगुप्ता यांनीही विचार व्यक्त केले. प्रशिक्षणात सहभागींंना प्रगत शिक्षण संस्था फलटणच्या संचालिका डॉ. मंजिरी निंबाळकर यांनी बागकाम, शिवणकाम, सफाई, सायकल दुरूस्ती, स्वयंपाक, बालसभा यासारख्या उपक्रमातून विविध इयत्तांचे विषयज्ञान कसे जोडले जाऊ शकते व संविधानिक मूल्यांवर आधारित सहयोगी शाळा संस्कृती कशी विकसित केली जाऊ शकते, याचे प्रशिक्षण प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे देण्यात आले.
पुण्यातील नवनिर्मिती या संस्थेच्या डॉ. प्रीती पै आणि स्वाती बाकरे, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा, कृणाल देसाई, जयमाला गावंडे, जयश्री कामडी, शंकर भोयर, पंडित चन्नोळे, शरद ताकसांडे, मीना काकडे, वर्षा खरडे, तुलिका वर्मा, अद्वैत देशपांडे, शुची सिन्हा आदींनी मार्गदर्शन केले. राकेश कुमार राय यांनी अनुभव कथन केले.
नयी तालिममध्ये महत्त्वाचा असतो. उत्पादक काम, निसर्ग व समाज यांच्यासोबत समाजजोडणी करीत ज्ञानाची बांधणी कशी करता येऊ शकते, हे आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभव घेत जाणून घेतले. अजय कुमार यादव यांनी आजच्या आधुनिक युगातही हे शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे आम्हाला या ठिकाणी समजले. आमच्या आदिवासी क्षेत्रात या पद्धतीचा उपयोग नक्कीच करणार, असे सांगितले. बिहार राज्यातील तेरा शाळांचे एकवीस शिक्षक प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

Web Title: Take inspiration and create new templates in Champaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.