डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधाकरिता उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:25 PM2018-08-26T22:25:33+5:302018-08-26T22:25:59+5:30

जिल्ह्यात डेंग्यू या किटकजन्य आजाराच्या संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सामान्य रुग्णालयात तातडीची सभा बोलावून आरोग्य विभाग व नगरपालिकेला डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या.

Take measures to prevent Dengue Disease | डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधाकरिता उपाययोजना करा

डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधाकरिता उपाययोजना करा

googlenewsNext
ठळक मुद्देविशेष सभा : जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरोग्य विभागासह नगरपालिकेला दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात डेंग्यू या किटकजन्य आजाराच्या संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सामान्य रुग्णालयात तातडीची सभा बोलावून आरोग्य विभाग व नगरपालिकेला डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या.
नगरपरिषद क्षेत्रात नगर परिषद कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी यांनी संयुक्तरित्या प्रत्येक वॉर्ड निहाय प्रत्येक घराचे प्रत्यक्ष डास अळी सर्वेक्षणात एडिस डास अळी आढळल्यास नगराध्यक्ष व संबंधित प्रभागाचे नगर सेवक यांची भेट घेवून माहिती द्यावी. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद यांना पत्राद्वारे कळविण्यात यावे. नगर परिषद, नगर पंचायतने शालेय विद्यार्थ्यांचे प्रभात फेरीचे आयोजन करून जनजागृती करावी. शालेय विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना द्यावा व किटकजन्य आजाराचे नियंत्रणात्मक उपाय योजनाबाबत माहिती व आरोग्य शिक्षण देण्यात यावे. तसेच जनेतेने आपल्या परिसरात डासोत्पती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही डॉ.मडावी यांची सुचीत केले. या सभेला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनुपम हिवलेकर, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, वैद्यकीय अधीक्षक, पुलगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारलवार, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे डॉ. मंगेश रेवतकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, साथ रोग तज्ज्ञ डॉ. विनीत झलके, डॉ. आनंद गाढवकर, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, पुलगांवचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, सेलुचे मुख्याधिकारी अंकुश जाधव उपस्थित होते. आ. डॉ. पंकज भोयर यांनीही सेलूच्या विश्रामगृहात डेंग्यूबाबत तातडीची सभा बोलावून नगरपंचायत व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करुन डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
डेंग्यू तापाची लक्षणे
एकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्रायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त ताहन लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढउतार, अंगावर पूरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्तमिश्रीत किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे आदी.

डेंग्यू ताप टाळण्यासाठी हे करा
पाण्याची भांडी व टाकी झाकूण ठेवावी. कुलर रिकामे करून कोरडे करावे. नारळाच्या करवंट्या, तुटलेली, फुटलेली भांडी इत्यादीची विल्हेवाट लावणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. डेंग्यूचा डास दिवसा चावणार असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे वापरावे. मच्छरदाणीचा नियमित वापर करावा. डेंग्यूचा उपचारावर विशेष औषधी किंवा लस उपलब्ध नाही. टायरच्या चळतीवर प्लास्टिक झाकावे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावावी. लक्षणानुसार संशयीत डेंग्यू रूग्ण आढळल्यास डेंग्यू तापाच्या निदानाकरिता रक्तजल नमूने जिल्हा हिवताप अधिकारी मार्फत वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे पाठविल्या जाते.

Web Title: Take measures to prevent Dengue Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.