‘त्या’ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

By admin | Published: May 20, 2017 02:16 AM2017-05-20T02:16:06+5:302017-05-20T02:16:35+5:30

शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी जयश्री रामटेके यांच्यावर दारूविक्रेत्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले.

'Take strong action against those' perpetrators' | ‘त्या’ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

‘त्या’ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

Next

एसपींना निवेदन : महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी जयश्री रामटेके यांच्यावर दारूविक्रेत्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत सदर घटनेतील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस. यांना दिलेल्या निवेदनातून प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
निवेदनातून, महिला पोलीस अधिकारी रामटेके या कर्तव्यावर असताना वर्धा शहरातील इतवारा परिसरात दारूबंदी मोहीमेंतर्गत छापा घालण्याकरिता गेल्या असता त्यांच्यावर दारू विक्रेत्यांनी हल्ला केला. या संपूर्ण प्रकाराचा प्रहार संघटा निषेध करते. जयश्री रामटेके यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. हा हल्ला केवळ त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांवरील नसून संपूर्ण पोलीस यंत्रणेवर केलेला हल्ला आहे. सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक या नात्याने आपण स्वत: जातीने लक्ष देत पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून योग्य पाऊल उचलण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दारूविक्रेत्यांकडून आतापर्यंत दारूबंदीसाठी काम करणाऱ्या महिलांवर हल्ले करण्यात आल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्याही दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जीवाचा आटापिटा करीत पोलिसांना सहकार्य करतात. परंतु, त्याचेच गॉडफादर अशी ओळख असलेल्या वर्धा पोलिसांवर असे हल्ले होत असतील तर सहाजिकच ते निंदनिय आहे, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. दारूविक्री व्यवसायाला सामान्य नागरिकांसह महिलांना किती त्रास होतो याची कल्पनाच न केलेली बरी. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गेलेल्या एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला म्हणजे शांतीप्रिय जिल्ह्याला काळीमा फासणाराच प्रकार असल्याचे निवेदनात नमुद आहे. निवेदन देताना विकास दांडगे, राजू लढी, प्रशांत गोडखांदे, आदित्य कोकडवार, मयूर ढाले, नावेद बैग, आकाश दांडगे, रोशन दाभाडे, नितीन काटकर, दादा बोरकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: 'Take strong action against those' perpetrators'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.