शहरीपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांत ‘टॅलेंट’ जास्तच
By Admin | Published: July 24, 2016 12:26 AM2016-07-24T00:26:08+5:302016-07-24T00:26:08+5:30
शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट जास्तच आहे. योग्य मार्गदर्शन आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्यानेच ते स्पर्धेत
शरद निंबाळकर : कुणबी-मराठा समाज मंडळाद्वारे सत्कार
कारंजा(घा.) : शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट जास्तच आहे. योग्य मार्गदर्शन आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्यानेच ते स्पर्धेत शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत थोडे मागे पडतात. प्रयत्न, चिकाटी आणि एकाग्रतेने अभ्यास करूनच जीवनातील ध्येय साध्य करता येते असे मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कुणबी-मराठी समाज मंडळाद्वारे ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ घेण्यात आला. प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून कोराडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे, विदर्भ मुख्याध्यापक संघ नागपूरचे कोषाध्यक्ष चंद्रकांत जवदंड, विशेष अतिथी म्हणून पं.स.सभापती संगीता खोडे, नगराध्यक्ष बेबी कठाणे, महिला कल्याण सभापती कारंजा बुवाडे आणि ज्योती सोनोने उपस्थित होते.
गुरूदेव सेवामंडळात झालेल्या या सत्कार सोहळ्यात दहावी व बारावीतील २५ गुणवंत विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यामध्ये दहावीतील वैष्णवी जसुतकर, वैष्णवी ढोबाळे, शुभम रमधम, स्नेहल कोरडे, दीक्षांत वानखेडे, मयुर काळे, प्रतीक्षा निवटे, वैष्णवी यावले, रोहीत ठाकरे, प्रतीक्षा ढोंगे, साक्षी भुसारी, प्रज्वल चौधरी, रूचीता यावले, चेतक भक्ते, पायल फुले व प्रतीक्षा मोहिते आणि बारावीतील वैभव ढोबाळे, सोनाली राऊत, आकाश रमधम, किरण रन्नवरे, जीवन दिवाणे, शीतल खरपकार, तेजस्विनी धोटे, चेतन भुयार, चारूक्षा राऊत यांचा समावेश होता. प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय कुणबी-मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा. अरूण फाळके यांनी करून दिला. प्रा. किरण भुयार यांनी संचालन केले. तेजस्विनी धोटे या विद्यार्थिनीने आभार मानले.
यशस्वीतेसाठी चंद्रकांत भुयार, अनिल भुसारी, राऊत, दंढारे, जाधव, दिलीप मानकर, चेतन एकापुरे, निलेश भुयार, मनोज चरडे, राजू इंगळे, रमेश चाफले, प्रवीण भिसे, कोरडे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)