शंकुतला एक्स्प्रेससंदर्भात मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा
By Admin | Published: April 22, 2017 02:09 AM2017-04-22T02:09:01+5:302017-04-22T02:09:01+5:30
शंकुतला एक्सप्रेस म्हणून लोकप्रिय असलेल्या पुलगाव-आर्वी या ३५ कि.मी लांबीच्या नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेज लाईनमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.
पुलगाव-आर्वी ब्रॉडगेज होणार : आर्वी-वरूड रेल्वेमार्गाचेही सर्व्हेक्षण
वर्धा : शंकुतला एक्सप्रेस म्हणून लोकप्रिय असलेल्या पुलगाव-आर्वी या ३५ कि.मी लांबीच्या नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेज लाईनमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे विभाग आणि राज्य सरकार यांच्यात संयुक्त भागिदारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आसून या प्रकल्पाचा अर्धा खर्च राज्य सरकार वहन करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात मुंबई येथे झालेल्या एका बैठकी संदभार्तील निर्णय घेण्यात आला. यातून वर्धा जिल्ह्याला फार मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आर्वी-वरूड या ६० कि.मी लांबीच्या नव्या रेल्वेमागार्साठी सर्वेक्षण करून ते डिसेंबर २०१७ पूर्वी रेल्वे बोर्डाकडे सादर करा, अशा सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बैठकीत दिल्या. या सर्वेक्षणासाठीच्या खचार्ची तरतूद केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात केली आहे. या निर्णयांमुळे आर्वी तालुका लाभान्वित होईल. दळणवळणाची साधने वाढणार असून या भागातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. बैठकीला रेल्वे मंत्रालय व राज्य सरकारच्या विविध खात्यांचे सचिव उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)