तालुकास्तरीय पशुप्रदर्शन

By Admin | Published: March 12, 2016 02:29 AM2016-03-12T02:29:46+5:302016-03-12T02:29:46+5:30

जि. प. चा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पशुप्रदर्शन हिंगणघाट येथील गोकुल धाम मैदानावर घेण्यात आले.

Taluka level demonstration | तालुकास्तरीय पशुप्रदर्शन

तालुकास्तरीय पशुप्रदर्शन

googlenewsNext

हिंगणघाट : जि. प. चा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पशुप्रदर्शन हिंगणघाट येथील गोकुल धाम मैदानावर घेण्यात आले. सदर प्रदर्शनात पाळीव जनावरांच्या विविध जातीसह त्यांच्या गुण वैशिष्ट्येबाबत मार्गदर्शन करीत बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभाग जि. प. वर्धा च्या सभापती शामलता अग्रवाल, माजी आमदार राजू तिमांडे, पं. स. हिंगणघाटचे सभापती संजय तपासे, उपसभापती मिलिंद कोपुलवार, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तिखे, जि. प. वर्धाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, डॉ. जयश्री भूगावकर, गट विकास अधिकारी स्वाती इथापे उपस्थित होते.
संकरित गाय गटात प्रथम पारितोषिक मयूर वरभे, वाघोली, द्वितीय मुरली घाटुर्ले, हिंगणघाट, तृतीय प्रफुल तडस, नांदगाव. संकरित कालवड गटात प्रथम पारितोषिक राजेश नारनवरे, वाघोली, द्वितीय उमेश तडस, नांदगाव, तृतीय उमेश नरड, अल्लीपूर. संकरित वासरे गटात प्रथम पारितोषिक राजु लाखे, सातेफळ, द्वितीय राजेंद्र पैचोरी, हिंगणघाट, तृतीय पुंडलिक वरभे, वाघोली. देशी गाय गटात प्रथम पारितोषिक गणेश लेबडिवार, हिंगणघाट, द्वितीय नितीन कटकमवार हिंगणघाट, तृतीय प्रवीण काळे, डायगव्हाण. म्हैस गटात प्रथम राजेश शाहू, हिंगणघाट, द्वितीय सतीश दुरगुडे, हिंगणघाट, तृतीय रवींद्र चंद्रभान घवघवे, हिंगणघाट, घोडे गटात प्रथम सुमित राऊत, हिंगणघाट, द्वितीय सौरभ जयस्वाल, हिंगणघाट, तृतीय गौरव तिमांडे, हिंगणघाट, कुत्रे गटात प्रथम शाम अलोणी, हिंगणघाट, द्वितीय सौरभ तिमांडे, हिंगणघाट, तृतीय संकेत गिरी, हिंगणघाट, शेळी गटात प्रथम गणेश नेहारे, हिंगणघाट, द्वितीय महेंद्र कन्हेर, वाकेश्वर, तृतीय धर्मेंद्र कोठेकर, वाकेश्वर यांनी पटकाविले. डॉ. पुरूषोत्तम वानखेडे, डॉ. नंदू रेवतकर, डॉ. संजय खोपडे यांनी परीक्षण केले. प्रास्ताविक डॉ. सतीश राजू, संचालन सचिन घोडे तर आभार डॉ. शशीकांत मांडेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. अमित लोहकरे, डॉ. देवगडे, डॉ. मनीषा डोनेकर, पौर्णिमा मेश्राम, विजय मेश्राम, प्रदीप थुल, अनिल दीक्षित, देवेश ठाकूर, अरूण चन्ने, सुभाष नागरे, येसनकर आदींनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Taluka level demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.