तथागत गौतम बुद्ध जगातील पहिले मनोवैज्ञानिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:27 PM2018-03-04T23:27:09+5:302018-03-04T23:27:09+5:30

आज समाजात अनेक वाईट रूढी, परंपरा व अंधश्रद्धा आहेत. सध्या विज्ञानाने बरीच प्रगती केली असली तरी समाजातील काही लोक विज्ञानाचा दुरूपयोग करून अनैतिकतेकडे वळताना दिसतात.

Tathagat Gautam Buddha is the world's first psychologist | तथागत गौतम बुद्ध जगातील पहिले मनोवैज्ञानिक

तथागत गौतम बुद्ध जगातील पहिले मनोवैज्ञानिक

Next
ठळक मुद्देराजकुमार मून : पाली भाषा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा

ऑनलाईन लोकमत
वर्धा : आज समाजात अनेक वाईट रूढी, परंपरा व अंधश्रद्धा आहेत. सध्या विज्ञानाने बरीच प्रगती केली असली तरी समाजातील काही लोक विज्ञानाचा दुरूपयोग करून अनैतिकतेकडे वळताना दिसतात. त्यामुळे नीतिमत्ता टिकविण्यासाठी विज्ञानासोबत धम्माची गरज आहे. २५५० वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी मानवी मनाचे तत्वज्ञान सांगितले. तथागत बुद्ध हे जगतले पहिले मनोवैज्ञानिक होते, असे प्रतिपादन राजकुमार मून यांनी केले.
सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक भवन प्रबुद्धनगर म्हसाळा येथे आयोजित पाली भाषा परीक्षेच्या पुरस्कार व सन्मानपत्र वितरण सोहळ्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाली भाषा मंडळ नागपूरचे अध्यक्ष तथा अभियंता शुद्धोधन बडवणे होते. व्यासपीठावर डॉ. प्रमोद नारायणे, विकास मानकर, बाबाराव खडतकर, नांदेडचे न्यायाधीश देवराज कांबळे, रमेश जोगे, सम्यक बुद्ध विहाराच्या अध्यक्षा वंदना पाटील आदी उपस्थित होते. डॉ. मून पुढे म्हणाले, गौतम बुद्ध यांना मनाचे कुशल शल्य चिकित्सक म्हणतात. आज बºयाच लोकांना मानसिक विकार जडल्याचे दिसून येते. त्याबाबत त्यांनी याप्रसंगी विविध उदाहरणेही दिलीत. आपल्या जीवन शैलीत बदल करून सकारात्मकतेने त्यावर मात करता येत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. डॉ. प्रमोद नारायणे यांनी पाली ही या देशाची मूळ भाषा असल्याचे सांगितले. न्यायाधीश देवराव कांबळे, रमेश जोगे, वंदना पाटील यांनीही विचार व्यक्त केले. परीक्षेचे प्रथम बक्षीस सरिता पखाले, द्वितीय स्रेहलता कांबळे, तृतीय अंजली कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. परीक्षा पाच केंद्रावर घेण्यात आली होती. प्रास्ताविक मुकूंद नाखले यांनी केले. संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार दिनेश वाणी यांनी मानले. हिंगणघाट तालुक्यातून नलीनी ठमके, शुभांगी पाटील, तेजस्विनी पाटील या बक्षीसासाठी पात्र ठरल्या.

Web Title: Tathagat Gautam Buddha is the world's first psychologist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.